मतदार यादीतून स्थलांतरित व बोगस नावे वगळणार; प्रत्येक बूथवर शिवसेनेचे BLA सक्रिय राहणार – आमदार कृपाल तुमाने

मतदार यादीतून स्थलांतरित व बोगस नावे वगळणार; प्रत्येक बूथवर शिवसेनेचे BLA सक्रिय राहणार – आमदार कृपाल तुमाने वरोरा, दि. १० – शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार कृपाल तुमाने यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मते, जिल्हा संघटक मुकेश जीवतोडे, भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, महिला जिल्हा प्रमुख  प्रतिमा ठाकूर, युवा नेते हर्षल शिंदे व आलेख रट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत बऱ्याच युवकांसह सुमठाणा येथील सरपंच शुभांगी दातारकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. आमदार तुमाने यांनी मतदार यादीच्या शुद्धीकरणावर भर देताना स्पष्ट केले की, जे लोक प्रत्यक्ष वार्डात राहतात त्यांचीच नावे मतदार यादीत असणे आवश्यक आहे. स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे यादीतून वगळण्यात येणार असून बोगस नावे हटवण्याची कारवाई निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरावलोकन कार्यक्रमाद्वारे (SIR) करण्यात येणार आहे. या कामी शिवसेनेचा प्रत्येक बूथ ले...

वरोरा तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेवर भगवा अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध .विजय मोकासे यांची अध्यक्षपदी, अरुण खारकर यांची उपाध्यक्षपदी एकमुखी निवड

वरोरा तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेवर भगवा अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध

विजय मोकासे यांची अध्यक्षपदी, अरुण खारकर यांची उपाध्यक्षपदी एकमुखी निवड

वरोरा, दि. १० एप्रिल – वरोरा तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या २०२५-२०२६ ते २०२९-२०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही विजय मोकासे यांची अध्यक्षपदी तर अरुण खारकर यांची उपाध्यक्षपदी एकमुखी व बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीमुळे संस्थेवर भगवा फडकला आहे.

ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांतता व एकमताने पार पडली. यामध्ये माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगडीया, वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, आमदार किशोर जोरगेवार तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी झाली.

या निवडणुकीच्या वेळी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा डॉ. विजय देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा उपसभापती जयंत टेमुर्डे, तात्या पाटील चौधरी, बाळूभाऊ भोयर, साहेबराव ठाकरे, विजय पावडे, चरण मोडक, चंद्रशेखर नौकरकार, रामदास थेटे, नंदा जुनगरे, तसेच सौ. ललिता देवतळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बिनविरोध निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असून, शेतकरी बांधवांच्या हितासाठी सर्व संचालक एकजुटीने काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Comments