वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे  हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
वरोरा / प्रतिनिधी

 कॉलरी वॉर्ड, वरोरा येथील कल्याणेश्वर हनुमान मंदिर परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले  हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाले. या संमेलनाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला  ग्राम दिंडी काढून धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना व उद्बोधनपर कार्यक्रम पार पडले.
या संमेलनात संत आशीर्वचनासाठी इंजिनियर उदयपाल वणीकर महाराज (राष्ट्रीय प्रबोधनकार, कीर्तनकार) यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख वक्ते म्हणून अतुल नंदकिशोर शेंडे (विवेक विचारमंच, विदर्भ प्रांत संयोजक) यांनी मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृती, एकता व सामाजिक बांधिलकी यावर विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष घुमे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते संचालन माया बजाज यांनी केले. त्यांच्या सुस्पष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
या कार्यक्रमाचे संयोजक संजय दानव यांचीही मंचावर उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन सुबकपणे पार पडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेविका मनिषा दानव, छाया चव्हाण, ज्योती किटे तसेच प्रशांत साळवे, सुनील इंगळे, प्रफुल मांदाडे, नूतन बुरडकर, सार्थक नागपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
या विराट हिंदू संमेलनामुळे परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्यात आला.

Comments