वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वणीच्या युवकाकडून १.२५ लाखांची अवैध विदेशी दारू जप्त स्कूटीवरून दारू नेताना आरोपी ताब्यात, वरोरा पोलिसांची कारवाईवरोरा मार्केटमधील निर्वाण वाईन शॉपमधून खरेदी. युवकाकडे परवाना नाही.

वणीच्या युवकाकडून १.२५ लाखांची अवैध विदेशी दारू जप्त
स्कूटीवरून दारू नेताना आरोपी ताब्यात, वरोरा पोलिसांची कारवाई

वरोरा मार्केटमधील निर्वाण वाईन शॉपमधून खरेदी. युवकाकडे परवाना नाही.

वरोरा (जि. चंद्रपुर) : वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोलिंग दरम्यान मुखबिराच्या खबरीवरून एका युवकाकडून मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ), ८१ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार अमोल मारोती नवघरे (बॅ. क्र. ९२४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना मुखबिराने कळवले की, वरोरा-वणी बायपास रोडवर शगुन मंगल कार्यालयाजवळ एक व्यक्ती काळ्या रंगाच्या स्कूटीवर अवैध विदेशी दारू नेत आहे. यावरून पंचांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला. दिनांक ०१/०४/२०२६ रोजी सायंकाळी ६.०५ वाजता संशयित स्कूटी (क्र. एमएच २९ बीएम ६६४९) दिसून आली. पोलिसांनी ती थांबवून आरोपीची झडती घेतली.

तपासणीदरम्यान स्कूटीच्या पुढील पायदानाजवळ प्लास्टिकच्या चुंगडीत मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली. आरोपीकडे दारूचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने नाव स्वप्निल अशोक चांदेकर (वय २९, धंदा मजुरी, रा. सेवानगर वार्ड क्र. १९, ता. वणी, जि. यवतमाळ) असे सांगितले. त्याने कबुली दिली की, ही दारू त्याने वरोरा मार्केटमधील निर्वाण वाईन शॉपमधून खरेदी केली असून वणी येथील बार मालक सत्यजित दीपक ठाकुरवार यांच्या सांगण्यावरून ती नेत होता. असे तक्रारीत नोंदवण्यात आले. बिना परवाना इतक्या मोठ्या प्रमाणात दारू वाईन शॉप मधून कोणत्या पद्धतीने दिली याचाही तपास पोलीस करीत आहे. 

पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये ओसी ब्लू, इंपीरियल ब्लू, मास्टर डिलाईट, रॉयल ग्रीन, एमसी डावेल्स, मुंबई माल्ट, आयकोनिक वाईट, रायल स्टॅग या विविध कंपन्यांच्या विस्कीच्या एकूण १२४ बाटल्या (वेगवेगळ्या क्षमतेच्या) असून तिची एकूण किंमत ३५,६१० रुपये आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कूटी (किंमत ८५,००० रुपये) व व्हिवो कंपनीचा मोबाईल (किंमत ५,००० रुपये) असा एकूण १,२५,६१० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments