वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत .


चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेल्या  पहिल्या महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत .

बातमी: चेतन लूतडे २/४/२६

चंद्रपूर दि. २ – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या फेरबदल केले आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. (भाप्रसे) यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या जागी राहणार असून, स्वामी यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करण्यात आले आहे.

त्याचबरोबर, विनय गौडा यांच्या जागी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या आदेशानुसार, विनय गौडा यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरचा कार्यभार दिलीप स्वामी यांच्याकडून स्वीकारावा, तर चंद्रपूरचा कार्यभार वसुमना पंत यांच्याकडे सोपवावा. बदली झाल्यानंतर कार्यभार हस्तांतरणाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आदेशाला सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी मंजुरी दिली आहे.

वसुमना पंत यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे:

  • ​नागपूर महानगरपालिका: अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.
  • रेशीम संचालनालय: नागपूर येथे संचालक म्हणून कार्यरत होत्या.
  • वनमती (VANAMATI): नागपूर येथे महासंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
...............

Comments