वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा येथे भरधाव मोटारसायकलने सायकलस्वाराला धडक; 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी

वरोरा येथे भरधाव मोटारसायकलने सायकलस्वाराला धडक; 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी

वरोरा (जि. चंद्रपुर) – येथील आनंदवन चौकाजवळ हॉटेल सिटी पॉईंटसमोर दिनांक 20 मार्च 2026 रोजी रात्री साधारणतः 11 वाजता एका भरधाव मोटारसायकलने सायकलस्वाराला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात 61 वर्षीय देवेंद्र माधव पाटील हे गंभीर जखमी झाले.

देवेंद्र पाटील हे गोविंदमॉल येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून ते आपल्या कुटुंबासह संतगाडगेबाबा नगर, टिळक वार्ड, वरोरा येथे राहतात. 20 मार्च रोजी रात्री जेवणासाठी घरी परतत असताना त्यांच्या सायकलला मागून मोटारसायकलने धडक दिली. यात ते रस्त्यावर कोसळले व काही वेळ बेशुद्ध झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना उठवून बसविले व खाजगी रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले तसेच डोक्याला मार लागला होता. दिनांक 21 मार्च रोजी उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

पुढील तपासणीसाठी ते काही दिवस नागपूर येथे नातेवाईकांकडे राहिले. दिनांक 31 मार्च रोजी ते वरोरा येथे परतले आहेत.

देवेंद्र पाटील यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीनुसार, मोटारसायकल चालकाचे नाव चिराग पांढरे (रा. वरोरा) असून त्याने आपली मोटारसायकल भरधाव व निष्काळजीपणे चालवून हा अपघात घडविला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

..........

Comments