वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा येथे सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी मारहाण; तोंडाला व डोळ्याला गंभीर दुखापत

वरोरा येथे सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी मारहाण; तोंडाला व डोळ्याला गंभीर दुखापत

वरोरा (जि. चंद्रपूर) – येथील कृष्ण नगरी परिसरात योग वर्गासाठी जात असताना एका सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी अडवून त्यांची बेदम मारहाण केली. या घटनेत शिक्षकांचे तोंड फुटून रक्तस्त्राव झाला असून डाव्या डोळ्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

विलास दशरथ हजारे (वय 61, सेवानिवृत्त शिक्षक, रा. कृष्ण नगरी, वरखडे लेआउट, टिळक वार्ड, वरोरा) हे पतंजली योग संस्थेचे निःशुल्क योग वर्ग घेतात. दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी साधारणतः 5.15 वाजता ते योग वर्गासाठी घरून पायी निघाले. कृष्ण नगरी बोर्डाजवळ हायवेवर आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, एका दुचाकी मोपेडवर तीन अनोळखी इसम उभे होते. त्यांनी लाल रंगाचे टी-शर्ट परिधान केले होते, तोंडाला कापड बांधले होते, तिघेही सडपातळ बांध्याचे असून वय अंदाजे 22 ते 25 वर्षे होते.

विलास हजारे यांना आशीर्वाद लेआउटच्या बोर्डाजवळ जाऊ देऊन तिघेजणही मोपेडने त्यांच्या मागून आले व त्यांची दुचाकी समोर आडवी करून त्यांना अडविले. त्यानंतर त्यांनी शिक्षकांना उद्देशून विचारले, "तू आम्हाला शिवीगाळ का केली?" असे म्हणत हातबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. एका आरोपीने शिक्षकांच्या तोंडावर ठोसा मारला, त्यामुळे तोंडातून रक्त निघाले व ओठ फुटले तसेच डाव्या डोळ्याला मार लागल्याने तो दुखत आहे. आरोपींनी शिक्षकांचे फोटोही काढले.

घटनेच्या दिवशी विलास हजारे गोंधळल्याने त्यांनी त्वरित तक्रार दिली नव्हती. दिनांक 2 एप्रिल रोजी त्यांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे जाऊन तोंडी तक्रार दिली आहे. या तीन अनोळखी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


Comments