खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड**खेमजई येथील घटना**आरोपीस आज सुनावली सजा*

* खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड* *खेमजई येथील घटना* *आरोपीस आज सुनावली सजा*  वरोडा : ठेंगडी सर       जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या आरोपावरून पुतण्यास ७ वर्षाचा कारावास व वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज 22 एप्रिल रोज बुधवार ला सुनावली.          घटनेची माहिती वरोडा तालुक्यातील खेमजई येथे कवडू झित्रा दडमल वय 60 वर्ष व यशवंत भाऊराव दडमल वय ३० वर्ष राहत होते. यांच्यात काका पुतण्याचे नाते होते. त्यांचा वडिलोपार्जित जागेवरून नेहमी वाद होत होता. आरोपी हा मृतकाला नेहमी जागेवरून टोमणे मारून,तू माझ्या पत्नीकडे का पाहतोस असे म्हणत सतत धमकी देत होता.       याच कारणावरून 12 एप्रिल 2021 ला सायंकाळी 7:45 च्या सुमारास आरोपी यशवंतने मृतक कवडू हा आपल्या दोन नातवंडासह घरात असतांना त्याचे डोक्यावर लाकडी टेणप्याने वार करून जखमी केले. मृतक जमिनीवर खाली पडला असतानाही त्याच टेणप्याने त्यास मारले असता कवडू दडमल हे मरण पावले.        मृतकाची पत्नी लिलाब...

वरोऱ्यात तरुणाची रेल्वेखाली झेप; 26 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू, शहरात शोककळाबातमी:

वरोऱ्यात तरुणाची रेल्वेखाली झेप; 26 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू, शहरात शोककळा

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा : शहरातील मालवीय वॉर्ड येथील 26 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली येत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी उघडकीस आली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण वरोरा शहरात शोककळा पसरली असून तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव क्रिष्णा मुरली यादव (वय 26, रा. मालवीय वॉर्ड, वरोरा) असे आहे. आज सकाळी सुमारे 11.50 वाजताच्या सुमारास आनंदवनकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील बोगद्याजवळ त्यांनी धावत्या रेल्वेसमोर झेप घेत आपले जीवन संपविले. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित तरुण नागपूर येथे नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

......

Comments