वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोडा पंचायत समितीत अंधार; वीज बिल थकीत, कनेक्शन खंडित.

वरोडा पंचायत समितीत अंधार; वीज बिल थकीत, कनेक्शन खंडित.

वरोडा: शाम ठेंगडी /25/3/26
ग्रामीण भागाची नाळ असलेल्या वरोडा पंचायत समितीत आर्थिक वर्षाच्या शेवटी अंधारच पाहायला मिळाला. सप्टेंबर २०२५ पासून वीजबिल थकीत असल्याने महावितरणने बुधवारी (दि. २५ मार्च) वीजपुरवठा खंडित केला. यामुळे काही काळ कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.

पंचायत समितीचे तब्बल १८० दिवसांहून अधिक काळापासून ५१ हजार ५८० रुपयांचे वीजबिल थकीत होते. वारंवार सूचना देऊनही बिल भरणा न केल्याने महावितरणने ही कठोर कारवाई केली. वीज खंडित झाल्याने संगणकाधारित सर्व कामे, ऑनलाइन सेवा, शासकीय योजनांचा अहवाल सादरीकरण, निधी वितरणासह अनेक महत्त्वाची कामे ठप्प पडली. मात्र, काही वेळाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

आकस्मिक निधी अप्राप्त : पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी ‘तभा’शी बोलताना सांगितले की, पंचायत समितीला मिळणारा आकस्मिक निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. मार्च संपत आला तरी हा निधी न मिळाल्याने वीजबिल, वाहनांसाठी डिझेल पुरवठा आणि इतर आकस्मिक खर्च करणे अवघड झाले आहे. यामुळे प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पंचायत समितीत कामासाठी आलेल्या नागरिकांना या कारवाईमुळे ताटकळत बसावे लागले. अनेकजण निराश होऊन परत गेले. आर्थिक वर्षाच्या अखेरीस अशी कारवाई झाल्याने कामांची गर्दी वाढली असतानाच प्रशासनाला या संकटाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी आकस्मिक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Comments