वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

रोटरी क्लब वरोराच्या वतीने पानपोई व गरजूंसाठी सूती दुपट्टा, चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन

 रोटरी क्लब वरोराच्या वतीने पानपोई व गरजूंसाठी सूती दुपट्टा, चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन

वरोरा : रोटरी क्लब वरोरा यांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पानपोई (पिण्याचे पाणी) तसेच गरजू व गरीब नागरिकांसाठी सूती दुपट्टे व चप्पल वितरण केंद्राचे उद्घाटन बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

नगर परिषद वरोरा यांच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, एजी अमित लाहोटी, प्रोजेक्ट हेड चेतन शर्मा, तसेच अमित नाहर, अभिजित मणियार, विशाल जाजू, अभिजित बोथले, अदनान सद्दीकोट, राम लोया, पियुष गुंडावार, विक्की आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, तसेच गरजूंना सूती दुपट्टे व चप्पलांचे वाटप व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित नागरिकांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रोटरी क्लब वरोराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments