आष्टा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 81 शिश्या जप्त, आरोपीवर गुन्हा

आष्टा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 81 शिश्या जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल.

बातमी:28/4/26

शेगाव (बु.) : भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे अवैध देशी दारू साठवून विक्री करणाऱ्या इसमावर शेगाव (बु.) पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई 26 एप्रिल रोजी दुपारी करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे व पोलीस हवालदार संतोष निषाद हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, आष्टा येथील शरद मारोती पेटकुले (वय 44) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करत आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह आरोपीच्या घरी धाड टाकली. पंचासमक्ष घराची झडती घेतली असता हॉलमधील एका कोपऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत 81 नग देशी दारूच्या सिलबंद शिश्या (प्रत्येकी 90 मि.ली.) आढळून आल्या. या दारूची किंमत सुमारे 3,240 रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडे दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष दारू जप्त केली. नमुना शिशी सील करून तपासासाठी ठेवण्यात आली.
या प्रकरणी शरद मारोती पेटकुले याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम 65 (ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शेगाव (बु.) पोलीस करीत आहेत.

Comments