वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधव मित्र परीवार, रेल्वे स्टेशन चौक तर्फे शिरकुरमा वाटप*

*रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधव मित्र परीवार, रेल्वे स्टेशन चौक तर्फे शिरकुरमा वाटप*

         वरोरा : येथील मुस्लिम समाज बांधव मित्र परीवार तर्फे रेल्वे स्टेशन चौक येथे शिरकुरमा वाटप करण्यात आले. आपसी भाईचारा, सर्व समाजांचा आदर, सन्मान, एकतेचे प्रतीक, पवित्र हा रमजान महिना माणला जातो याचे औचित्य साधून मुस्लिम समाजबंधवां तर्फे शिरकुरमा वाटप करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी श्री. अहेतेशाम अली ( जिल्हा उपाध्यक्ष - जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर तथा माजी नगराध्यक्ष वरोरा ), श्री.छोटुभाई शेख( माजी बांधकाम सभापती-न. प.वरोरा ), मनोज गुप्ता,इस्माईल शेख, मुस्ताक शेख,शहेजाद शेख, रमजू शेख, शाहरुख शेख, फिरोज शेख, अलताफ, साकिब, नजर, शहेबाज, विकी, फारियाद, आवेश, अयान, सिकंदर, जावेद, महेशभाऊ, बालू,दीपक बागडे, फैजलं शेख, नासिर, पियुष झाडे, अनिस शेख व इतर नागरीक या प्रसंगी उपस्थित होते.

Comments