वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा.

वरोरा:22/3/26 शहरातील ओपन स्पेसमध्ये साफसफाई आणि लाइटिंगच्या सुविधांअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नातून वार्डातील साफसफाईला सुरुवात झाली असून ओपन स्पेस विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून गजानन नगर येथील ओपन स्पेस मध्ये आमदार व नगरपालिकेच्या सहकार्यातून  सर्वांगीण साफसफाई करून नवीन लाइट सिस्टीम बसविण्यात आली होती. 

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या बगिच्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत नगरसेवक बंडूभाऊ देऊळकर, अनिलभाऊ झोटिंग, राहुल देवडे, अनिल पाटील सर, गौरकर सर, गोखरे सर, गठ्ठना मामा, धोटे सर, बुरीले सर, चौधरी सर, डॉ. हटवार साहेब, सौ. हटवार, संगीत नवघरे, सौ. नवघरे मॅडम यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नांतून वार्डातील साफसफाई व विकासाची कामे सुरू असून ओपन स्पेस डेव्हलप करण्याचा त्यांचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या बगिच्यामुळे वार्डातील नागरिकांना फिरण्यासाठी एक स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित जागा उपलब्ध झाल्याने समस्त नागरिकांनी पालिकेचे व नगरसेवकांचे आभार मानले आहेत.

Comments