"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी"

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी" वरोरा- आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे भारतरत्न डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर,प्रमुख वक्ते:- प्रा. डॉ. नरेंद्र पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) प्रा. नीरज आत्राम ( रा. से. यो.कार्यक्रम अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर यांनी भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकरांच्या महान कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “डॉ.बाबासाहेबांनी केवळ भारतीय संविधानाची निर्मिती केली नाही, तर त्यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात करणे अत्यंत आवश्यक आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे भान ठेवून प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, आजच्या काळात डॉ.बाबासाहेबांचे विचार अधिकच म...

दुचाकी वाहन जळून खाकवरोरा तालुक्यात धक्कादायक घटना: मार्डा रोडवर कुणबी भवनजवळ दुचाकी अचानक पेटली.

दुचाकी वाहन जळून खाक
वरोरा तालुक्यात धक्कादायक घटना: मार्डा रोडवर कुणबी भवनजवळ दुचाकी अचानक पेटली.

वरोरा : वरोरा तालुक्यातील मार्डा रोडवर कुणबी भवनच्या बाजूने जाणाऱ्या नवीन हायवेजवळ एक भीषण अपघात घडला. वडगाव येथील रहिवासी श्री प्रमोद पिंपळशेंडे यांच्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले. ही घटना आज दुपारी घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, श्री पिंपळशेंडे आपल्या दुचाकीने मार्डा रोडवरून जात असताना अचानक वाहनातून धूर येऊ लागला आणि क्षणार्धात दुचाकीला आग लागली. आग एवढी भयानक होती की, चालकाला वाहन थांबवून जीव मुठीत धरून बाजूला पळावे लागले. वाहन विझवण्याचा कोणताही प्रयत्न करण्याआधीच आगीने रौद्र रूप धारण केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Comments