प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वारजूरकर कुटुंबाचा भाजपमध्ये मोठा प्रवेश; बंटीभाऊ भांगडिया यांच्या विकास धोरणांचा विश्वास ठेवून घेतला पक्षांतर

 वारजूरकर कुटुंबाचा भाजपमध्ये मोठा प्रवेश; बंटीभाऊ भांगडिया यांच्या विकास धोरणांचा विश्वास ठेवून घेतला पक्षांतर

चिमूर: माननीय कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्या विकासाभिमुख धोरणांवर श्रद्धा ठेवत, काँग्रेस पक्षातील एक प्रतिष्ठित नेते डॉ. अविनाश भाऊ वारजूरकर यांनी आपल्या कुटुंबियांसह आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर यांच्यासह, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी महासचिव डॉ. सतीश वारजूरकर, युथ काँग्रेसचे प्रदेश महासचिव व शंकरपूरचे सरपंच साहिष सतीश वारजूरकर आणि पलाश अविनाश वारजूरकर यांनीही भाजपची सदस्यत्व घेतली.

हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजप नेते रवींद्र शिंदे, जिल्हा बँक संचालक आवेश खान पठाण, संचालक गणेश तर्वेकर, विलास ईकार आणि सचिन आकुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी उपस्थित राहून वारजूरकर कुटुंबियांचे भाजप कुटुंबात मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी, "भाजप परिवारात नव्या जोमाने सामील झालेल्या या नेतृत्वामुळे संघटनात्मक बळ अधिक वृद्धिंगत होईल," असा विश्वास व्यक्त केला. या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Comments