प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

नोटबुक-पुस्तक आणि गणवेश विक्री करणाऱ्या शाळांवर कारवाई करा . *गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार

नोटबुक-पुस्तक आणि गणवेश विक्री करणाऱ्या शाळांवर कारवाई करा .
बांधकाम सभापती मनीष जेठानी यांची मागणी.
*गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार 

वरोरा : शहर परिसरातील काही खाजगी शाळांमधून पुस्तके आणि नोटबुक तसेच शालेय साहित विक्री केले जात आहे. विविध प्रकाशनाची पुस्तके विकताना संपूर्ण पुस्तकांचा संच घेण्यासाठी पालकांवर दबाव टाकून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. यामुळे शासकीय नियमांना डावलून शाळेच्या परिसरातून पुस्तके-नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्य आणि गणवेश विक्री करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक तसेच नगर परिषदेचे बांधकाम सभापती मनीष जेठानी यांनी गटशिक्षण अधिकारी वरोरा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
शैक्षणिक संस्था या व्यवसायिक नसून त्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत. परंतु अलीकडे काही खाजगी शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाचा बाजार मांडून व्यावसायिकरण सुरू केले आहे. वरोरा शहरातील सेंड ॲन्स पब्लिक स्कूल आणि हायस्कूल तसेच संस्कार भारती पब्लिक स्कूल या शाळेच्या परिसरात खाजगी प्रकाशनाची पुस्तके ,वह्या, नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्य आणि गणवेश बाजार भावांपेक्षाही अधिक किमतीने विकण्याचे प्रकार सुरू आहे. पालकांना यासाठी सक्ती करून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. शासकीय नियमानुसार ‌शैक्षणिक संस्थांच्या परिसरातून अशाप्रकारे शैक्षणिक साहित्य विकण्यास बंदी असतानाही या नियमाला सदर शाळा वेशीवर टांगत आहे.

 वरोरा शहरातील सेन्ट ॲन्स पब्लिक स्कूल, सेन्ट ॲन्स हायस्कूल, संस्कार भारती पब्लिक स्कूल या शाळा व्यवस्थापनाकडून मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. शाळांची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर निकालाच्या दिवशीच पुस्तके व शैक्षणिक साहित्य विकण्याचा घाट या शाळांकडून घातला जात आहे.विशेष म्हणजे सक्तीने विकण्यात आलेली अनेक पुस्तके वर्षभर उघडली देखील जात नसल्याचे म्हटले जाते. परंतु कमिशनच्या हव्यासापोटी शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना सक्तीने विकून ‌पालकांची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे.

 यासंदर्भात अनेक पालकांनी शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक तथा नगर परिषदेचे बांधकाम सभापती मनीष जेठानी यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन मनीष जेठानी यांनी याबाबत वरोरा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे  निवेदन देऊन शाळा परिसरातून नोटबुक पुस्तके किंवा अन्य साहित्य विकणाचा प्रकार त्वरित थांबवा व या शाळांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सदर निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील सत्रात लागणाऱ्या पुस्तकांची यादी शाळेनी दर्शनी भागावर लावावी किंवा सदर यादी शिक्षण विभागाकडे सोपवावी, शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दहा दिवस पर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्याची सूट द्यावी असे म्हटले आहे. तसेच यापुढे शाळांच्या परिसरात पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचे आढळून आल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेत सदर पुस्तके ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांना मोफत वाटप करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments