वरोऱ्यातील दारुंदे ते नेहरू चौक मार्गाचे सीसी रोडचे बांधकाम. बांधकाम दिलेल्या इस्टिमेट नुसारच करा. शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख पंकज नाशिककर यांची मागणी.



वरोऱ्यातील दारुंदे ते नेहरू चौक मार्गाचे सीसी रोडचे बांधकाम. 

बांधकाम दिलेल्या इस्टिमेट नुसारच करा. शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख पंकज नाशिककर यांची मागणी.

वरोरा, जि. चंद्रपूर: वरोरा नगरपालिका परिषदेच्या प्रभाग क्र. ०७ मधील नागरिकांची वर्षानुवर्षांची रस्त्यांची समस्या लवकरच सुटणार आहे. दारुंदे यांच्या घरापासून ते नेहरू चौकापर्यंतच्या प्रमुख मार्गावर उच्च दर्जाचे सिमेंट काँक्रीटीकरण (सी.सी. रोड) करण्यात येत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पेव्हर ब्लॉकचे बांधकाम सुरू झाली आहे. 

अंदाजे 36 लाखाचा रोड असून कॉन्ट्रॅक्टर आवारी या रोडचे बांधकाम करीत आहे. एकूण १९६ मीटर लांबीचा हा रस्ता ४ मीटर रुंदीचा असून, पादचाऱ्यांच्या सोयीसाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १ मीटर रुंदीचे पेव्हर ब्लॉक बांधले जाणार आहेत.

कामाच्या आरंभीच जुना अस्तित्वात असलेला दाणेदार रस्त्याचा पृष्ठभाग ५० मिमी खोलीपर्यंत खरवडून काढण्यात येत आहे. त्यानंतर मातीकाम आणि उत्खनन करून पायासाठी कठीण मुरूमचा पुरवठा करून व्हायब्रेटरी रोलरने तो दाबण्यात येणार आहे.

रस्त्याच्या पायाभूत मजबुतीसाठी 'मिक्स इन प्लेस' पद्धतीने दोन प्रकारचे दाणेदार सब-बेस (ग्रेडिंग I व II) बसविण्यात येणार आहेत. हे थर रस्त्याची वहन क्षमता (भार सहन करण्याची ताकद) वाढविण्यास महत्त्वाचे ठरणार आहेत.

याशिवाय, रस्त्याच्या आयुष्यात वाढ करण्यासाठी आणि जमिनीतील ओलावा वर येऊ नये म्हणून काँक्रीटीकरणापूर्वी १२५ मायक्रॉन जाडीची एलडीपीई (LDPE) शीट अंथरण्यात येणार आहे.

मात्र शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक पंकज नाशिककर यांनी या रोड बाबत आक्षेप घेतला असून जुन्या डांबर रोड वरील डांबर काढून दिलेल्या नियमाप्रमाणे बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र विचारपूस केली असता या डांबर रोड वरतीच नवीन सीसी रोड बांधण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे या बांधकाम रोड वरती त्यांनी आपला आक्षेप नोंदवला होता. यानंतर मुख्याधिकारी व संबंधित इंजिनियर यांनी पाहणी करून नाशिककर यांना टेक्निकल बाजू समजावून सांगितली होती. 
मात्र नाशिककर यांनी दिलेल्या इस्टिमेट नुसार हा रोड झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. 

तांत्रिक बाबीनुसार 50 एम एम स्टॅरिंग म्हणजे सहा ते सात इंच डांबर रोडचे खोदून माल काढणे . व त्याजागी ठोस मुरूम व दिलेल्या पद्धतीने रोड तयार करणे अशी आहे. 
परंतु यामध्ये डांबराच्या खाली रोड गिट्ठीचा असल्याने आणि ती गिट्टी काढल्यास रोडचे मजबुतीकरण होणार नाही असा अहवाल मुख्याधिकाऱ्यांनी व इंजिनियरने दिला होता. 

यावर नाशिककर यांनी सांगितले की जर ही गोष्ट मुख्याधिकारी व इंजिनियर ला माहित होती तर मग स्कॅनिंग साठी पैसे का बरं लावले? स्कॅनिंग निघाल्यावर खराब माल नेऊन टाकण्यासाठी पैसे अंदाजपत्रकात का लावले? गटाराची व्यवस्था करून पाणी निघण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती जेणेकरून पुढे रोड फोडण्याचे काम होणार नाही. त्यामुळे दिलेल्या अंदाजपत्रकानुसार हे काम होणे आवश्यक असल्याचे मत नाशिककर यांनी व्यक्त केले आहे. 
..............

शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जोवतोडे यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळा.

Comments