आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन तर्फे देशातील पहिली क्रीडा दिंडी – खेळातून नशामुक्तीचा संदेश

आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन तर्फे देशातील पहिली क्रीडा दिंडी – खेळातून नशामुक्तीचा संदेश

Warora 
10/01/2026
महारोगी सेवा समिती, वरोरा संचलित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन यांच्या वतीने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांच्या जयंती औचित्य साधून महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी “क्रीडा दिंडीचे” भव्य आयोजन करण्यात येत आहे. क्रीडा से निर्माण चारित्र्य का, चारित्र्य से निर्माण राष्ट्र का हा उदात्त हेतू सदैव पुढे ठेऊन महाविद्यालय चरित्रवान युवकांच्या व समाजाच्या निर्मितीकरिता विविध उपक्रम राबवत असते. त्याच श्रृंखलेत नशामुक्त, व्यसनमुक्त समाज निर्माण करणे हा या क्रीडा दिंडीचा मुख्य उद्देश असून युवकांना व्यसनांपासून दूर ठेवून क्रीडेकडे वळविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
या क्रीडा दिंडीत आनंद निकेतन महाविद्यालयासह विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आतापर्यंत धार्मिक स्वरूपातील दिंडी, वृक्षदिंडी, स्वच्छता दिंडी, ग्रंथ दिंडी अशा विविध प्रकारच्या दिंड्या सर्वांनी पाहिल्या असतील; मात्र संपूर्ण देशात प्रथमच “क्रीडा दिंडी”चा अभिनव प्रयोग श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे होत आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
आयोजकांनी यावेळी सांगितले की, बाबा आमटेनी वृक्षदिंडीची सुरुवात सुद्धा सर्वप्रथम आनंदवनातूनच झाली होती आणि त्याच परंपरेतून समाजप्रबोधनाचे नवे प्रयोग आनंदवन सातत्याने राबवत आहे. क्रीडा दिंडीच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, संघभावना तसेच नशामुक्त जीवनशैलीचे महत्त्व प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविले जाणार आहे. क्रीडा दिंडी मध्ये भारतीय पारंपारिक क्रीडा व व्यायाम प्रकारांचे तसेच ३५ विविध  क्रीडाप्रकारांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
१५ जानेवारीला सकाळी ९:०० वाजता क्रीडादिंडीला प्रारंभ होणार असून 
या क्रीडा दिंडीचा मार्ग आनंद निकेतन महाविद्यालय → आनंदवन चौक → छत्रपती शिवाजी महाराज चौक → विनायक लेआउट मार्गे → चंद्रपूर–नागपूर हायवे → आनंदवन चौक → आणि समाप्ती आनंद निकेतन महाविद्यालय असा निश्चित करण्यात आला आहे.
हा उपक्रम महारोगी सेवा समिती, वरोरा चे सचिव डॉ विकास आमटे, विश्वस्त कौस्तुभ आमटे, सौ पल्लवी आमटे, डॉ विजय पोळ, सुधाकर कडू, माधव कवीश्वर, सदाशिव ताजणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा राधा सवाने यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तानाजी बायस्कर, श्री सचिन साळुंखे, प्रा मोक्षदा मनोहर, प्रा संदीप पारखी, प्रा राठोड, प्रा तिलक ढोबळे, प्रा हेमंत परचाके, प्रा नीरज आत्रम व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व खेळाडू उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असून नागरिकांनी या क्रीडा दिंडीत सहभागी होऊन नशामुक्तीच्या संदेशाला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
*****

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा वाढदिवस साजरा 


Comments