वरोरा येथे २२ जानेवारीला महायज्ञ आणि निःशुल्क योग शिबिराचे आयोजन

वरोरा येथे २२ जानेवारीला महायज्ञ आणि निःशुल्क योग शिबिराचे आयोजन

वरोरा: जागतिक आरोग्याचा संदेश देणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. द्वारकानगरीतील हनुमान मंदिर, आनंदवन चौक येथे २२ जानेवारी २०२६, गुरुवारी सकाळी ७ वाजता 'महायज्ञ' सोहळा भरविण्यात येणार आहे. यज्ञामुळे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धी होऊन जगाला प्रकाश मिळेल, अशी श्रद्धा व्यक्त करण्यात आली आहे.

संत श्री मनीष भाईजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या यज्ञात सर्वांनी सहभागी होऊन आनंदाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी निवेदनात सांगितले आहे. यज्ञासाठी शंभर रुपयांत सामग्रीचे पॉकेट मंदिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहभागींनी पूजेचे काही साहित्य स्वतःहून आणावे, असेही सांगण्यात आले आहे.

याचसोबत, २०, २१ आणि २२ जानेवारी या तीन दिवसांसाठी सकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत निःशुल्क योग शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. अनिवाळ, हजारे, गोल्हर, डॉ. तेला, डॉ. डोलींकर यासह अनेक योग शिक्षक या शिबिराचे मार्गदर्शन करणार आहेत.

महायज्ञ आयोजन समिती, पतंजली योग समिती, गायत्री परिवार, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, स्वामी समर्थ परिवार, माहेश्वरी मंडळ, धर्मजागरण परिवार, विदर्भ तेली समाज महासंघ, मानवधर्म सेवा समिती, आनंदम फ्रेंडशिप असोसिएशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, खैरे कुणबी समाज मंडळ तसेच गोपाळकृष्ण गृहनिर्माण सहकारी संस्था या सर्व संस्था मिळून हा समाजकार्यक्रम राबवीत आहेत.

अधिक माहितीसाठी ८९७५८७९२२८, ७७६८८९१३३३, ९८५०२२५६८१, ९५१८७५३६११, ९४२२८२६७३२, ९५०३३६०५८६, ९८२२२९५७७५ या क्रमांकावर संपर्क करता येईल.

"यज्ञातील ही शुद्ध हवा, सर्व रोगांवर औषध आहे!" अशी घोषणा करणारा हा सामुदायिक कार्यक्रम सर्व वर्गातील आणि सर्व वयोगटातील लोकांचे स्वागत आहे.

Comments