माढेळी-पवनी-मांगली रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट * खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप * *केंद्रीय बांधकाम मंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार *अधिकाऱ्याचे निलंबन करून कार्यवाही करण्याची मागणी


माढेळी-पवनी-मांगली रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट 
* खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप 
* *केंद्रीय बांधकाम मंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार 
*अधिकाऱ्याचे निलंबन करून कार्यवाही करण्याची मागणी

वरोरा/प्रतिनिधी.14/01/2026
वरोरा : तालुक्यातील माढेळी-पवनी-येवती-केळी-उमरी- मांगली या १९ किलोमीटर राज्य महामार्गाचे काम सुरू असून सदर काम अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ५ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रारीतून केला आहे. सदर तक्रारीत त्यांनी यात अधिकारी दोषी असून त्यांचे निलंबन करून कार्यवाही करण्याची मागणी देखील ‌केली आहे.
वरोरा तालुक्यातील माढेळी-पवनी-येवती-केळी-उमरी-
मांगली‌ या राज्य महामार्ग क्रमांक ३३१ चे एमडीआर २ किलोमीटर ते १९ किलोमीटर पर्यंतचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास आणि गरज लक्षात घेऊन सीआरएफ अंतर्गत तरतुदीत रस्त्याचे काम मंजूर करून आणले आहे. परंतु सदर कामाबाबत परिसरातील नागरिकांकडून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे
 कामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. हे काम ज्या कंत्राटदाराला मिळाले आहे, त्याने अंदाजपत्रकाच्या केवळ ०.०२% कमी दराने निविदा भरून घेतले असून सुद्धा काम निकृष्ट दर्ज्याचे होत असल्याचा आरोप ‌आहे. यामुळे सदर कामाची तक्रार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. त्यांनी या तक्रारी मधून अनेक आरोप केले आहे. कामात ठिकठिकाणी‌ डब्ल्यूबीएम साठी वापरले जाणारे मटेरीअल ग्रेट नुसार आहे .

काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी रस्ता दबणे व डब्ल्यूबीएम उखडणे ,कामा करिता रस्त्यावर जमा केलेले गिट्टी व इतर मटेरीअलचे अद्याप टेस्टिंग झाले नसून गिट्टी मध्ये डस्टचे प्रमाण व मुरुम मध्ये काळ्या मातीचे प्रमाण क्षमतेपेक्षा जास्त दिसून येत असल्याने कामाच्या सुरुवातीलाच मटेरीअल टेस्टिंग करावे, कामामध्ये एमपीएम ५० मिमी जाडीचे गड्ढे भरून काढण्याकरिता आणि ७५ मिमी जाडीचे रस्त्याच्या पूर्ण रुंदी करिता‌ असे दोन प्रकारे दिलेले आहे. परंतु सध्या स्तिथीत पूर्ण रुंदीचे एमपीएम झालेले असून त्याच्या पृष्ट्भागात अनियमितता आढळून येते आणि पृष्ठभाग समतल आढळून येत नाही.ज्यामुळे प्रवाशांना वाहतुकीस त्रास होत आहे व झटके सहन करावे लागत आहे.यावरून  कंत्राटदाराने ५० मिमी ने एम पी एम करून गड्ढे  किंवा ७५ मिमी मध्ये जाळी अनियमित किंवा जाडी कमी केली आहे. एमपीएम करिता साईट वर जमा केलेल्या गिट्टी मध्ये खूप डस्ट आहे व गिट्टी जास्त तर २० ते ३० मिमी ची आढळून आली आहे. डब्ल्यू बी एम करिता वापरत आणले जाणारे मुरुम हे रस्त्याच्या बाजूला नाली खोदून तेथील काळी माती खोदून जमा करण्यात येत आहे.काम सुरु असतांना सुरक्षा सूचक फलक लावण्यात आले नसून वळण मार्ग तयार करताना मुरमा ऐवजी मातीचा वापर करण्यात आला आहे. तसेच वळण मार्गाचे फलक लावण्यात आलेले नाही.
परिणामी सदर काम त्वरित थांबवून ‌थांबविण्यात रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा तसेच संबंधीत कंत्राटदारावर योग्य ती कार्यवाही करून देयके थांबविण्यात यावी व निकृष्ट काम केल्याबद्दल योग्य तो दंड आकारण्यात यावा, तसेच निकृष्ट काम करून घेणारे सार्वजनिक बांधकाम उप विभाग वरोरा चे उप विभागीय अभियंता अक्षय लोहे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. सदर पत्राच्या प्रती त्यांनी
नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता‌ तसेच नागपूर येथील गुणनियंत्रक मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना उचित कार्यवाहीसाठी पाठविले आहे.
***************

Comments