सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य समारंभ; नवनगराध्यक्ष अर्चना ठाकरे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व आमदार करण देवतळे यांची उपस्थिती

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य समारंभ; नवनगराध्यक्ष अर्चना ठाकरे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व आमदार करण देवतळे यांची उपस्थिती

वरोरा 06/01/2026

: वरोरा तालुका माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भव्य मिरवणूक, वरोरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम करण्यात आला.

कार्यक्रमाचे औचित्य साधून नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व शिक्षणप्रसाराच्या कार्याला वंदन केले. त्यांनी म्हटले, "सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रम, त्याग आणि संघर्षामुळेच आज माझ्यासारख्या सामान्य महिलेला नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. त्यांनी महिलांना शिक्षण, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा मार्ग दाखवला." त्यांच्या भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे महत्त्वही रेखाटले.

कार्यक्रमास माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. संमेलनाच्या अध्यक्षपदी सौ. जयश्रीताई सातोकार होत्या. यावेळी आमदार करण देवतळे, श्री. दामूभाऊ धावडे, श्री. विलास नेरकर तसेच ॲड. श्रीकांत नागरीकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

माळी समाज सेवा मंडळाने आयोजित केलेला हा सोहळा सामाजिक जागृती व शैक्षणिक प्रेरणा देणारा ठरला.

Comments