*तरुणाईला समाजभान देणारे व्यासपीठ म्हणजे रा. से. यो. : श्री सुधाकर कडू*

*तरुणाईला समाजभान देणारे व्यासपीठ  म्हणजे रा. से. यो. : श्री सुधाकर कडू* 

राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा तरुणाईला समाजभान देणारे  व्यासपीठ असून ती आज काळाची गरज आहे असे उदगार महारोगी  सेवा समितीचे विश्वस्त श्री सुधाकर कडू यांनी दि. १७ जानेवारी रोजी  राष्ट्रीय सेवा योजने च्या निवासी  शिबिराच्या समारोपीय सत्रात काढले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित, महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा  संचालित आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोराच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान विशेष निवासी शिबिर वरोरा तालुक्यातील दिंडोडा ( खु.) या गावी घेण्यात आले.

 शिबिराच्या उद्घाटकीय सत्राला  दि. १२ जानेवारी रोजी उद्घाटक म्हणून  मा. श्री. सचिन पिंपळकर पोलीस पाटील दिंदोडा ( खु) यांनी हे शिबीर विद्यार्थ्यांनी  ग्रामीण समाजशास्त्र समजून घेत आपलं आकलन व्यापक करण्याची संधी समजावे असे मत  मांडले . तसेच अध्यक्षस्थाना वरून बोलतांना प्राचार्य  डॉ एस एस पोतदार यांनी शिबिराच्या माध्यमातून आपलं ज्ञान  शेतकऱ्यां पर्यंत पोहचविण्याचे तसेच त्यांच्या परंपरा समजून घेण्याचे  आवाहन विदयार्थ्यांना केले. 

सदर शिबिरादरम्यान गावातील ९० कुटुंबाचे सामाजिक तथा आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले.  रोज सकाळी योगासन वर्ग,  ग्रामस्वच्छता,  सुंदर रांगोळी स्वच्छ अंगण सारख्या स्पर्धेच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून  देण्यात आले. बाल चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून गावातील बालकांचा चित्रकलेतील  उत्साह वाढविण्यात आला.  ग्रामस्थांच्या तसेच शिबिरातील स्वयंसेवकांच्या रक्तक्षय व इतर वैद्यकीय तपासणी करिता शिबिर राबविण्यात आले, जवळपास ८६ ग्रामस्थ तथा शिबिरार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सोबतच गावातील पशुपालकांसाठी पशुचिकित्सा शिबीर घेण्यात आले. ज्यामध्ये लसीकरण ,स्वच्छ गोठा, रिंगणीची शस्त्रक्रिया,  गर्भधारणा तपासणी याकरिता  ६५ पशुपालकांनी विविध सुविधांचा उपयोग घेतला. कृषी विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना विविध कॉर्नर सभेच्या माध्यमातून करण्यात आले.   रोज होणाऱ्या विविध सामाजिक विषयावरील पथनाट्याच्या माध्यमातून स्वयंसेवकाच्या वतीने गावातील लोकांचे प्रबोधन करण्यात आले.

 दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये पडीक जमीन विकास व पाणलोट , स्वच्छ भारत अभियान , राष्ट्रीय सेवा योजना व युवक ,  ध्यान - मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली , शेतकरी कल्याणार्थ शासकीय योजना , महिला व बाल विकासाच्या योजना , नैसर्गिक शेती स्वरूप व उपयोगिता ,  यावर अनुक्रमे सौ तपस्वी खेलूरकर पाणी फौंडेशन चंद्रपूर , श्री चंद्रशेखर झाडे वरोरा, प्रा. अभय तायडे बडनेरा, श्री दीपक शिव आनंदवन वरोरा, श्री गजानन हटवार कृषी अधिकारी वरोरा, श्री शरद पारखी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी वरोरा, डॉ . सतीश इमडे आ. नि. कृ. महा. वरोरा यांनी मार्गदर्शन केले.

शिबिरा दरम्यान  स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. रोज संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे  समाज प्रबोधन तथा मनोरंजन करण्यात आले. सदर सांस्कृतिक कार्यक्रमातील विदयार्थ्यांच्या सादरीकरणाला  पंचक्रोशीतील गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंसेवक, गावकरी भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काढलेल्या वृक्ष तथा संविधान दिंडीने समारोपीय दिवस भक्तिमय झाला.

 सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये श्री गुणवंत ठेंगणे सरपंच , श्री दीपक धाडसे, श्री सचिन पिंपळकर , श्री पुरुषोत्तम चौधरी तथा समस्त ग्रामपंचायत सदस्य,  ग्रामस्थ यांचे योगदान लाभले .  या शिबिराचे आयोजन शिबिर संयोजक श्री राहुल तायडे यांचे नेतृत्वात सौ.  मिली पूसदेकर,  डॉ. अश्विनी मानकर, डॉ.  मुकुंद पातोंड , डॉ.  विजय पाटील, डॉ. स्वप्नील पंचभाई , डॉ. रवींद्र बनकर , श्री अनिल चौधरी , श्री विनोद बेलखुडे , श्री राजकुमार गायकवाड  तथा समस्त शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी  यांच्या सहकार्याने करण्यात आले.

.......

Comments