गांधी उद्यान योग मंडळ, वरोरा यांचा समाजसेवेचा नवा उपक्रम – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे;स्मृती लॉकरचे लोकार्पण

गांधी उद्यान योग मंडळ, वरोरा यांचा समाजसेवेचा नवा उपक्रम – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे;
स्मृती लॉकरचे लोकार्पण

वरोरा /चेतन लूतडे 

वरोरा, दिनांक 13 जानेवारी 2026 ‘सेवा परमो धर्म’ या तत्त्वावर चालत गांधी उद्यान योग मंडळ, वरोरा समाजसेवेच्या नव्या उपक्रमास सुरुवात करीत आहे. संस्थेने दारिद्र्यरेषेखालील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी अंत्यविधीसाठी आवश्यक असणारी ९ मण लाकडे मोफत पुरवण्याचा महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे.
तसेच, संस्थेचे अध्यक्ष श्री नरेंद्र नेमाडे यांच्या वतीने स्वर्गीय श्री प्रभाकरराव नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदू स्मशानभूमी, वरोरा येथे अस्थी आणि अस्मा ठेवण्यासाठी स्मृती लॉकरची सोय करण्यात आली आहे.

या दोन्ही समाजहितैषी उपक्रमांचे लोकार्पण व शुभारंभ मकरसंक्रांतीच्या शुभ दिनी, दि. १४ जानेवारी २०२६, बुधवारी सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नगराध्यक्ष सौ. अर्चना ठाकरे (अर्चनाताई आशिष ठाकरे) तसेच योगगुरु श्री प्रकाश संचेती (प्रकाशजी संचेती) यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू स्मशानभूमी, वणी नाका, वरोरा येथे संपन्न होईल.

संस्थेने सर्व सहृदय नागरिकांना या समाजकार्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यास सर्वांची उपस्थिती प्रार्थनापूर्वक सहर्ष आमंत्रित गांधी उद्यान योग मंडळांनी केले आहे.



Comments