वरोरा पोलिसांची शेत चोरी प्रकरणात लगेच धरपकड : दोन आरोपी अटक, ६९ हजार रुपयांचा चोरीचा माल जप्त

वरोरा पोलिसांची शेत चोरी प्रकरणात लगेच धरपकड : दोन आरोपी अटक, ६९ हजार रुपयांचा चोरीचा माल जप्त

वरोरा, दि. २४ जानेवारी : वरोरा तालुक्यातील एकार्जुना गावात दोन शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंप व केबल चोरी झाल्याच्या प्रकरणी वरोरा पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन आरोपींची अटक केली असून ६९ हजार रुपयांचा चोरीचा माल जप्त केला आहे.

या चोरीची फिर्याद दि. २३ जानेवारी रोजी फिर्यादी श्री. रितीक थेरे यांनी वरोरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार, त्यांच्या व शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातील दोन मोटार पंप व केबल चोरी गेल्या होत्या.

फिर्याद मिळताच वरोरा पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने त्वरित चौकशी सुरू केली. शेताच्या परिसरातील रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील गोकुळनगर, वणी येथील आरोपी क्र. ०१ सिताराम आसाराम भिसे व आरोपी क्र. ०२ सुनील रामप्रसाद साळुंखे यांना अटक केली आहे.

पोलिसांकडून जप्त केलेला चोरीचा माल खालीलप्रमाणे आहे:

· दोन मोटार पंप : किंमत सुमारे ६०,००० रुपये
· केबल : किंमत सुमारे ९,००० रुपये
  एकूण मूल्य : ६९,००० रुपये

आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे त्यांचा मौल्यवान माल लगेच परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हे प्रकरण पोलिस अधीक्षक, चंद्रपूर; अप्पर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर; उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनी शरद भस्मे, पोहवा दिलीप सुर, पोहवा संदिप मुळे, पो. अं. महेश गावतुरे, पो. अं. सौरभ कुलथे यांनी केलेल्या कष्टाचे फलित आहे.

Comments