स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम
वरोरा : सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुद्देशीय संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर संस्था वर्गाचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय पुष्पलता मारोती घुमे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 25 जानेवारी रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोरा येथे पार पडले.
शिबिराचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सागर वझे व नगरसेविका मनीषा संजय दानव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मारोती घुमे, उपाध्यक्ष संजय दानव, सचिव आशिष घुमे, पत्रकार सारथी ठाकूर, पत्रकार अभिषेक भागडे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी नगरसेवक संतोष पवार, प्रवीण चिमुरकर, अक्षय भिवदरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते भरत तेला, सचिन तडस, मंगेश पिसाळ, संजय गयनेवार, अमित आसेकर, महादेव पारखी यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
या रक्तदान शिबिरात 24 रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत साळवे, चेतन बुरडकर, नूतन बुरडकर, फिरोज शेख, सुनील इंगळे, आशिष करडभूजे, शंकर आत्राम, हर्षल दानव यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment