*आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंना राज्यस्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक*

*आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंना राज्यस्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला द्वारा मूर्तीजापुर जि. अकोला येथे शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे 
दिनांक 20 ते 22 जानेवारी 2026 या कालावधी आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालयाची वर्ग १२ वी ची विद्यार्थिनी कु. सलोनी कुंभारे हिने ६० ते ६५ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले व चंद्रपूर जिल्ह्यास पहिल्यांदा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे मानांकन प्राप्त करून दिले. 
तसेच आनंद निकेतन महाविद्यालयात मागील ६ वर्षापासून बॉक्सिंग खेळाचा सराव करणारी दिशा सायन्स कॉमर्स आर्ट्स क. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. गार्गी भोयर या खेळाडूंने कांस्यपदक प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे.  कु.सलोनी कुंभारे ही आगामी होणाऱ्या 69 व्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बंगळूर कर्नाटक येथे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. 
खेळाडूंच्या या भरघोस यशाबद्दल नियमित प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक पंकज शेंडे तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा तानाजी बायस्कर, श्री सचिन साळुंखे व  विजयी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे, विश्वस्त श्री कौस्तुभ आमटे, सौ पल्लवी आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा राधा सवाने , डॉ विजय पोळ, श्री सुधाकर कडू  तसेच संपूर्ण विश्वस्त मंडळ व विजय डोबाळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. बी. प्रेमचंद, महाराष्ट्र बॉक्सिंग एड व्हॉक कमिटीचे समन्वयक डॉ. राकेश तिवारी, लता इंदूरकर, सचिव श्री बंडावार, प्रा संगीता बंबोडे तसेच सर्व  शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.


Comments