वरोरा, २० जानेवारी २०२६ : नगरपरिषद वरोरा येथे मंगळवारी विविध विभागांच्या सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासमध्ये पीठासीन अधिकारी मा. सिद्धार्थ मेश्राम तथा नगरपरिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. अर्चना ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडलेल्या सभापतींची यादी पुढीलप्रमाणे आहे:
· शिक्षण सभापती : उपाध्यक्षा सौ. योगिता भारत नेरकर
· बांधकाम सभापती : श्री. मनीष जेठानी
· पाणीपुरवठा सभापती : श्री. गजानन जीवतोडे
· नियोजन सभापती : श्री. राहुल देवडे
· महिला व बालकल्याण सभापती : श्रीमती रेखा तेलतुंबडे
· स्वच्छता व आरोग्य सभापती : श्रीमती मंगला पिंपळकर
त्याचबरोबर, उपसभापती सौ. सुषमा चांभारे यांनीही पदभार स्वीकारला. शिवाय, श्री. गजानन मेश्राम, श्री. अभय ठावरी आणि श्री. खेमराज कुरेकार यांना स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष श्री. विलास भाऊ नेरकर , माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, आशिषभाऊ ठाकरे , माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment