चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित या बँकेच्या मुख्य शाखेत आज प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या हस्ते येथे मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बँकेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर अध्यक्ष शिंदे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताख दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ करण्याचा प्रेरणादायी संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रभक्तीपर वातावरण दिसून आले. सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत मुखरित केले. हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित पद्धतीने संपन्न झाला.
बँक अधिकार्यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेतर्फे राष्ट्रीय सण उत्साहात साजरे करण्यात आले. अशा कार्यक्रमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सामूहिकता, देशाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा विकास होतो, असे त्यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment