वरोरा
महारोगी सेवा समिती संचालित वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य फलोद्यान आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोद्यान मंडळ - एकात्मिक फलोद्यान विकास अभियानांतर्गत *मशरूम उत्पादन तंत्रज्ञान* या विषयावर निवासी व निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक ०६ ते ०८ जानेवारी २०२६ या दरम्यान करण्यात आले.
प्रशिक्षणाचे उदघाटन डॉ. सुहास पोतदार, प्राचार्य आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, श्री रवि राठोड, तालुका कृषी अधिकारी, वरोरा, सौ. मिली पुसदेकर, प्रशिक्षण संयोजिका यांच्या उपस्थितीत झाले. या प्रशिक्षणात चंद्रपूर, वर्धा, नागपूर व भंडारा या चार जिल्ह्यातील एकूण ३४ प्रशिक्षणार्थींनी आपला सहभाग नोंदवला. मशरूम उत्पादन परिचय, महत्त्व, मशरूमचे गुणधर्म, उत्पादन तंत्रज्ञान, मशरूम उत्पादनासाठी आवश्यक बाबी, माध्यम निवड, माध्यम निर्जंतुकीकरण, पिशवी भरणे, त्याचे व्यवस्थापन, रोग नियंत्रण, काढणी, मशरूमचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, विक्री व्यवस्थापन व मशरूम उत्पादनाशी निगडीत विविध शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच या प्रशिक्षणात प्रकल्प भेटीचे आयोजन श्री प्रफुल्ल शेंडे, मु. पो. खुटाळा तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर यांच्या GBS मशरूम अँड ऍग्रो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड येथे करण्यात आले. या प्रशिक्षणात डॉ मनोज जोगी, डॉ प्रशांत वाघ, डॉ प्रशांत राखोंडे, डॉ रविशंकर पारधी, श्री पवन पांडे, सौ विजयालक्ष्मी मानकर, श्री. अडकिने यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी डॉ अनिल भोगावे, श्री अनिल चौधरी, सौ मीना अंबाडे यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment