खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*स्थगित झालेल्या नगर परिषद/ पंचायत निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर*वरोरा नगरपालिका निवडणूक प्रभाग सात ब साठी मतदान होणार.

*स्थगित झालेल्या नगर परिषद/ पंचायत निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर*

वरोरा नगरपालिका निवडणूक प्रभाग सात ब साठी मतदान होणार.

चंद्रपूर, दि. ०४ : महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील नियम १७(१)(ब) नुसार आवश्यक कार्यवाही न झाल्यामुळे नगरपरिषद/नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी काही जागांसाठीची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार पुढील नगर परिषदांच्या नमूद जागांकरिता निवडणुका पार पडणार आहेत.
१) घुग्घुस नगर परिषद (अध्यक्ष व सर्व सदस्य)
२) गडचांदूर नगर परिषद जागा क्र. ८-ब  सर्वसाधारण (महिला), 
३) मूल नगर परिषद जागा क्र. १०-ब (सर्वसाधारण) 
४) बल्लारपूर नगर परिषद जागा क्र. ९-अ (ना.मा.प्र.) 
५) वरोरा नगर परिषद जागा क्र. ७-ब ( सर्वसाधारण)

*सुधारित निवडणूक कार्यक्रम*
१. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक :
१० डिसेंबर २०२५, दुपारी ३.०० वाजेपर्यंत, 
२. चिन्हवाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी :
११ डिसेंबर २०२५
३. मतदान (आवश्यक असल्यास) :
२० डिसेंबर २०२५, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०
४. मतमोजणी व निकाल जाहीर : २१ डिसेंबर २०२५ सकाळी १०.०० वाजतापासून
५. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्धी :
२३ डिसेंबर २०२५ पूर्वी (कलम १९ अन्वये) करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
००००००


Comments