खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक**सार्वजनिक ठिकाणी कुंपण, निर्जंतुकीकरण व आश्रयस्थाने उभारण्याच्या सूचना*

*मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*

*सार्वजनिक ठिकाणी कुंपण, निर्जंतुकीकरण व आश्रयस्थाने उभारण्याच्या सूचना*

चंद्रपूर, दि. 15 : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल रिट पिटीशनच्या  07 नोव्हेंबर 2025 रोजी पारित आदेशानुसार, मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली विस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

भारतीय जीवजंतु कल्याण बोर्डाने निर्धारित केलेल्या SOP (Standard Operating Procedure) नुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्था, सार्वजनिक व खाजगी रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानके व डेपो (आंतरराज्य बस टर्मिनलसह), रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे, बाल उद्याने, पर्यटन व मनोरंजन स्थळे आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी कुंपण, सीमा भिंत व प्रवेशद्वार उभारण्याच्या सूचना दिल्या. ही संरक्षक तटबंदी किमान 6 फूट उंचीची असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच संबंधित व्यवस्थापनांनी भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी व स्वच्छतेसाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. परिसरातील कुत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण, लसीकरण व निर्बीजीकरण करून मनपा अथवा नगरपालिकांनी चालविलेल्या आश्रयस्थानी किंवा प्राणी कल्याण संस्था, गोशाळा, पांजरपोळ व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मनपा आयुक्त व नगरपालिकांना दिलेल्या प्रमुख सूचना :
• सार्वजनिक ठिकाणांवरून पकडलेल्या कुत्र्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निर्जंतुकीकरण व लसीकरण करणे.
• आश्रयस्थानी ठेवण्यापूर्वी कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे, याची खातरजमा करणे व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर व साहित्य उपलब्ध करून देणे.
• विशेषतः 6 महिन्यांवरील नर कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करणे व 5 वर्षांपर्यंत दरवर्षी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे.
• भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुत्र्यांसाठी सुसज्ज आश्रयस्थाने उभारणे व त्याठिकाणी पाणी, खाद्य, स्वच्छता व देखरेखीची योग्य व्यवस्था ठेवणे.
• आक्रमक अथवा रेबीज बाधित कुत्र्यांना ज्या परिसरातून पकडले आहे त्या परिसरात पुन्हा सोडू नये.

मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  विनय गौडा जी.सी यावेळी केले.

Comments