महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या ‘आरक्षणाची गरज नाही’ विधानावर आमदार करण देवतळे यांचा कडाडून निषेध.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर;  खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या ‘आरक्षणाची गरज नाही’ विधानावर आमदार करण देवतळे यांचा कडाडून निषेध. वरोरा : १९/४/२६ लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित डिलीमिटेशन घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश मते सरकारला मिळाली नाहीत. सरकारच्या बाजूने २९८ मते पडली तर विरोधात २३० मते पडली. विधेयक नामंजूर झाल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांनी स्पष्ट केले. यानंतर देशभर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर–आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेच्या पटलावर केलेले विधान वादात आले आहे. खासदार धानोरकर म्हणाल्या, "महिलांना आरक्षणाची गरज नाही. महिलांना शंभर टक्के आरक्षण असते. पुरुषांच्या जागेवरही महिला लढू शकतात. आम्ही पुरुषांच्या जागेवर लढून संसदेत आलो. आरक्षणाशिवाय इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या. हे बिल खरोखर महिलांना अधिकार देणारे आहे का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.           ...

अवैधरित्या देशी बनावटी लोखंडी (अग्नीशस्त्र) देशी कट्टा बाळगणाऱ्या इसमांविरुध्द सापळा कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई

अवैधरित्या देशी बनावटी लोखंडी (अग्नीशस्त्र) देशी कट्टा बाळगणाऱ्या इसमांविरुध्द सापळा कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई

चंद्रपूर 

दिनांक ०५/१२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहिती चे आधारे पो.स्टे. बल्लारपूर हद्दीत जुने पेपर मिल कॉलनी परिसरात सापळा रचुन आरोपी नामे राहुल दिनेश डंगोरे वय ३९ वर्ष रा. पंडीत दिनदयाल वार्ड बल्लारपूर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन अवैध रित्या बाळगुन असलेला एक देशी बनावटीची लोखंडी (अग्नीशस्त्र) देशी कट्टा किं.अं.५०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आसदर आ सदर आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध क्रमांक १००८/२०२५ कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे-अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकार, सफौ. स्वामीदास चालेकर, पोहवा. अजय बागेसर, किशोर वैरागडे, पोअं. गोपीनाथ नरोटे, किशोर वाकाटे, शेखर माथनकर, चापोहवा प्रमोद डंभारे व चापोअं रिषभबारसिंगे यांनी केली आहे.

Comments