आनंदवन पटांगणात फिरण्यासाठी शंभर रुपयाचे मासिक शुल्क .स्थानिक नागरिकांचा विरोध. RTI दाखल.इंनडोअर मल्टीपर्पज हॉल कोणासाठी ?

आनंदवन पटांगणात फिरण्यासाठी शंभर रुपयाचे मासिक शुल्क .
स्थानिक नागरिकांचा विरोध. RTI दाखल.

इंनडोअर मल्टीपर्पज हॉल कोणासाठी ?

वरोरा १२/१२/२०२५

आनंदवन, वरोरा : बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाच्या परिसरात समुदायाच्या सहभागातून विकासाचे नवे आव्हानात्मक टप्पे गाठण्यात आले आहेत. शासनाकडून मिळालेल्या जमिनीवर उभारलेल्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांमध्ये सामुदायिक सहभाग वाढविण्याच्या प्रयत्नांतर्गत काही नवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. 
आनंदवन महाविद्यालयाच्या मैदानाचा वापर सुव्यवस्थित होण्यासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी एक नियमावली अमलात आणण्यात आली आहे. या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, मैदानाच्या दैनंदिन देखभालीच्या खर्चासाठीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे मैदान निःशुल्क राहिले आहे तसेच सामुदायिक कार्यक्रमांसाठीही ते पूर्वीप्रमाणेच वापरण्यास उपलब्ध आहे. 
मात्र काही नागरिकांनी याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मैदानावर फिरण्यासाठी महिन्याकाठी शंभर रुपयाचा पास आकारण्यात आलेला आहे. हा कोणत्या नियमा अंतर्गत व कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतो याबाबत सविस्तर माहिती अधिकारात वनकर यांनी आनंद निकेतन महाविद्यालयाला मागितला आहे. काही निवडक लोकांना हा पास लागत नाही त्याचे कारण सुद्धा अजून पर्यंत कळाले नाही. हा भेदभाव असून या बाबीचा कडाडून विरोध केल्या जात आहे.

महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी योगा व कराटे व पोलीस प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांद्वारे विद्यार्थी आणि स्थानिक समुदाय यांच्यात आरोग्य जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उन्हाळी शिबिरांद्वारे युवक-युवतींमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जातो. यावर नाममात्र फी आकारण्यात येते असते. 

त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी आणि परिसरातील इतर नागरिक ,वयोवृद्ध नागरिक, महिला या ठिकाणी फिरण्यासाठी येऊ शकत नाही. सर्व दरवाजे बंद असल्याने ठराविक गेटमधूनच पासधारकांनाच मैदानावर घेण्याची परवानगी असते. याबाबत सुद्धा माहितीचा अधिकार महाविद्यालयाला मागण्यात आला आहे.

आनंदवनातील विविध योजना आणि कार्यक्रम समुदायाच्या सहकार्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेण्यात येत आहेत. बाबा आमटे यांनी मांडलेल्या मानवता, सेवा आणि समृद्धी या तत्त्वांच्या आधारे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आनंदवन कार्यरत असल्याचे मत शिक्षकाने व तेथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

आनंद निकेतन महाविद्यालयातील पटांगणात इंनडोअर मल्टीपर्पज हॉल बांधकाम करण्याचे काम जोरात सुरू आहे. माहितीच्या आधारे केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालयाने तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून याबाबतचे बांधकाम  परिसरात केले जात आहे. जवळपासच्या खेड्यापाड्यातील युवकांसाठी  व आनंदवन परिसरातील दिव्यांग व अनाथ बांधवांसाठी या इंडोवर मल्टीपर्पज हॉलचा खेळण्यासाठी समाज उपयोगी फायदा होणार असल्याचा ठाराव ग्रामपंचायत आनंदवन ने पारित केला आहे.

या परिसरामध्ये जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, कृषी विद्यालय, दिव्यांग व मूकबधिर विद्यालय , वस्तीगृह या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा याच मैदानाचा उपयोग आजपर्यंत होत आला आहे. पण आता या विद्यार्थ्यांना चिमूर महामार्गावर फिरून आनंदवन महाविद्यालयातील गेटमधून जावे लागत आहे. याबाबत रितसर एका शाळेची तक्रार विभागीय अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.  यूजीसीच्या नियमानुसार शैक्षणिक संस्थाचे सामाजिक दायित्व असून तेथील मैदानाचा तेथील विद्यार्थ्यांना व  सामाजिक क्रीडा कार्यक्रमांना उपयोग झाला पाहिजे अशा सूचना आहे.

त्यामुळे खरंच वरोरा तालुक्यातील युवकांसाठी व क्रीडा प्रेमींसाठी आनंदवनचे मैदान वरोरा तालुक्यातील कौशल्य घडविण्यासाठी कामात येईल की नाही . यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत.

आनंद निकेतन महाविद्यालयातील  तानाजी बायस्कर सरांनी जे क्रीडा क्षेत्रात अलौकिक बदल केलेला आहे यातही दुमत नाही. क्रीडा क्षेत्रासाठी ते वरदान ठरत आहे ‌. त्यामुळे काही नियम जरी कठोर असतील त्यामध्ये महाविद्यालयातील प्राचार्यांनी व महारोगी सेवा समितीने तडजोड करून सर्वसामान्य जनतेसाठी पटांगण खुले ठेवावे असे मत नागरिक व बाहेरील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
----------------------------------




Comments