स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यशः चोरीचा लोखंडी भंगार वाहतुक करणारे पाच जण अटक, पिकअप व सुमारे आठ लाख रुपयांचा माल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी यशः चोरीचा लोखंडी भंगार वाहतुक करणारे पाच जण अटक, पिकअप व सुमारे आठ लाख रुपयांचा माल जप्त
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर अवैध लोखंडी भंगार वाहतुक करणाऱ्या पाच व्यक्तींना रोखण्यात यश मिळवले असून, त्यांचे पिकअप वाहन व सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी ही कार्यवाही करण्यात आली.
अटक झालेले आरोपी :
१.दुर्गेश तुळशीराम भागडे (वय २१ वर्ष)
२.रोशन उमेश भोयर (वय २१ वर्ष)
३.कृष्णा संजय गदईकर (वय १९ वर्ष)
४.अशोक बनेश झाडे (वय ४१ वर्ष)
५.दिवाकर तुळशीराम भागडे
सर्व आरोपीचंद्रपूर रहिवासी असून, सहावा आरोपी साबीर शेख याचा शोध सध्या सुरू आहे.
जप्त झालेला माल :
· पिकअप वाहन क्र. एमएच ३४ बीझेड ८६५३ (अंदाजित किंमत : ५,००,०००/- रुपये)
· लोखंडी भंगार - २५०० किलो (अंदाजित किंमत : २,५०,०००/- रुपये)
· गॅस कटर सिलेंडर - ०३ नग (अंदाजित किंमत : ३०,०००/- रुपये)
· घरगुती गॅस सिलेंडर - ०१ नग (अंदाजित किंमत : २,०००/- रुपये)
एकूण जप्त माल :अंदाजे ७,८२,०००/- (सात लाख ब्याऐंशी हजार) रुपये किंमतीचा.
गुन्हा दाखल :
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथेमहाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यवाही करणारा पथक :
हीयशस्वी कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकातर्फे करण्यात आली. पथकात पोलिस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकर, पोलिस उपनिरीक्षक धनराज करकाडे, हेड कॉन्स्टेबल गणेश भोयर, पोलिस कॉन्स्टेबल संतोष येलपुलवार, पोलिस कॉन्स्टेबल सुमित बरडे व पोलिस कॉन्स्टेबल प्रफुल गारघाटे यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment