वरोरा नगरपालिका निवडणुकीत ज्योती नितीन मत्ते यांची उमेदवारी जाहीर ,शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या छत्रछायेखाली महिलांचे राजकीय सक्षमीकरण वाढवण्याचा प्रयत्न.
शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या छत्रछायेखाली महिलांचे राजकीय सक्षमीकरण वाढवण्याचा प्रयत्न.
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा - शिवसेना (एकनाथ शिंदे )ने वरोरा नगरपालिका निवडणुकीत आपली उमेदवारी जाहिर केली आहे. पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या पत्नी सौ. ज्योती नितीन मत्ते यांची उमेदवारी पक्षतर्फे स्वतंत्र धनुष्यबाण चिन्हावर जाहीर केल्याने वरोरा नगरपालिकेमध्ये प्रबळ दावेदारी घोषित केली आहे.
ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 50 टक्के महिला आरक्षणासह संपन्न करण्यासाठी कार्यरत आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि राजकारणातील सहभाग वाढवणे हे या पक्षाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
वरोरा न.प. निवडणुकीतील प्रमुख उमेदवार.
भाजपने या क्षेत्रातील आपल्या उमेदवारासाठी प्रबळ ओबीसी महिला चेहरा सौ. माया रमेश राजुरकर व काँग्रेस तर्फे सौ. अर्चना आशिष ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्योती नितीन मत्ते., उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे सौ. सोनम पंकज नाशिककर या प्रमुख महिला उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या व्यतिरिक्तही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
याचबरोबर सर्व प्रमुख पक्षांनी 13 प्रभागांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणूक प्रचाराचे वारे सुरू झाले आहे.त्यामुळे वरोरा नगरपालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहिण' योजनेचे यशस्वीरीत्या अंमलबजावणी केल्यानंतर, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र धनुष्यबाण चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निवडणुकांमुळे 50 टक्के महिला आरक्षण लागू असल्याने महिलांचा राजकीय सहभागात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. हा महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीमध्ये जिल्हाप्रमुख नितीन मत्ते , लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे, शिवसेनेचे खंदे समर्थक खेमराज कुरेकर , आलेख रट्टे किशोर टिपले, संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वामुळे शिवसेना पक्ष अधिक मजबूत परिस्थितीत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
.......
जाहिरात
Comments
Post a Comment