*अकोला येथील तुळशी विवाहाने निर्माण केला सामाजिक एकोपा!* *विवाहाची पंचक्रोशीत चर्चा**विवाह अख्या गावाचा सहभाग*

*अकोला येथील तुळशी विवाहाने निर्माण केला सामाजिक एकोपा!*

 *विवाहाची पंचक्रोशीत चर्चा*
*विवाह अख्या गावाचा सहभाग*
वरोडा : शाम ठेंगडी 

     दैनिक तरुण भारत च्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या तुलसी विवाह या उपक्रमाला वरोडा तालुक्यातील ग्रामीण भागात उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.थोरणा या गावानंतर अनेक गावात तुलसी विवाहात अख्खे गावच्या गाव सहभागी होत असल्याच्या होत आहेत हे विशेष. या उपक्रमामुळे सामाजिक एकोपा जपल्याची भावना नागरिकात चर्चिली जात आहे.
       वरोडा तालुक्यातील अकोला नंबर १ व कोटबाळा येथील सामूहिक सामूहिक तुलसी विवाह अख्खे गाव सहभागी झाले हे विशेष.

वरोडा तालुक्यातील अकोला नं.१ येथील गुरुदेव सेवा मंडळ आणि ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आठ नंबर रोज शनिवारला तुळशी विवाह आयोजित करण्यात आला होता. दैनिक तरुण भारत पुरस्कृत या सामूहिक तुळशी विवाहाने गावकऱ्यांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण करण्याचे काम केले आहे.  या तुळशी विवाहाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
ग्रामीण भागात तुळशी विवाहाला सांस्कृतिक तसेच धार्मिक महत्त्व आहे. या तुळशी विवाहाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचे काम अकोला येथील ग्रामवासी नेहमीच करीत असतात. त्याचाच प्रत्यय या तुळशी विवाहाच्या माध्यमातून दिसून आला.
तरुण भारतच्या माध्यमातून हा तुळशी विवाह गावात घेण्यात आला. या विवाहासाठी  तरुण भारतनी साहित्य पुरविले होते.

गावातून बँडवाजामध्ये वराची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळाच्या आवारात वधू पक्षाकडून वर पक्षाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पूजाअर्चा, अंतरपाठ आणि मंगलाष्टकाच्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. विवाहानंतर आरती करण्यात आली. गावातील शामदेव उमरे यांनी यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था केली. रात्रोला महिला मंडळाच्या वतीने भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
    अकोला १ या छोट्याशा गावात विविध कार्यक्रम होत असतात. पण हा आगळावेगळा कार्यक्रम ठरल्याचे लोकांनी सांगितले. गावामध्ये चार-पाच मुलं मुली लग्नाची आहेत. त्यांची लग्न लवकर जुळो असे साकडे गावकऱ्यांनी यावेळी घातले. संचालन आणि आभार अरुण उमरे यांनी केले.
या विवाह सोहळ्याला गुरुदेव सेवा मंडळाचे सदाशिव उमरे, भास्कर चवले, गजानन उमरे, केशव उमरे, शामदेव उमरे, निखिल चवले, कमलाकर काकडे, चिंतामण बुटके, भैय्या उमरे, तात्याजी उमरे, भाऊराव भोगेकर, प्रतिभा उमरे, शामराव मटाले, विठ्ठल पुसाम, महेश उमरे, लहानू बावणे, भागरथा उमरे, अशोक उमरे, प्रकाश उमरे, पुंडलिक नन्नावरे, छोटू चवले, शशिकला चवले, मिना उमरे, कुसुम सावसाकडे, अरुणा गाढवे, छाया उमरे, मोतीराम घानोडे, दामोदर मटाले, अंजना भोगेकर, कल्पना कळसकर, हरी कळसकर,इंदिरा बुटके, मिरा बुटके, रेखा उमरे, दिवाकर रंदई, निलेश काकडे, वंदना काकडे, दिलीप भोगेकर, कलावती मटाले, शशिकला मटाले, सरिता पुसाम, कवडू पुसाम, बेबी घानोडे, पार्वता उमरे, कुमुद उमरे, अर्चना उमरे, भगवान उमरे, रंजना नन्नावरे, अर्चना नन्नावरे आदी उपस्थित होते. या सामूहिक तुळशी विवाहामुळे गावकऱ्यांमध्ये  धार्मिक मूल्याची जाणीव अधिक बळकट होणार आहे.
     *कोटबाळा*
      कोटबाळा हे वरोडा तालुक्यातील 300 लोकसंख्या असलेले गाव.या गावातील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरातही 8 नोव्हेंबर रोज शनिवारला सामूहिक तुळशी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सामूहिक तुळशी विवाहातही गावातील जवळपास सर्वच महिला, पुरुष रंगीबेरंगी कपडे घालून सहभागी झाल्या होत्या. विठ्ठल रुक्माई मंदिरात हा तुळशी विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. विवाह नंतर गोपाल काला करण्यात आला.या तुळशी विवाहासाठी गोपाल निब्रड, वैशाली गारघाटे, किशोर देऊळकर,प्रवीण पिंपळकर, वामन डाखरे,महेंद्र गारघाटे, सुरेश डाखरे,शत्रुघ्न ढोक यांनी परिश्रम घेतले.

Comments