भाजपा वरोरा मध्ये नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी, मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश

भाजपा वरोरा मध्ये नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी, मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश

माजी नगरसेवक गोदावरी गौतम वानखेड़े यांचा भाजप प्रवेश.

वरोरा : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षात (भाजपा) मोठ्या संख्येने जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून आले आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा वरोरा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा प्रबळ दावा मांडत आहे.
पक्षाच्या तेराही प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, नगराध्यक्ष पदासाठी रमेश राजूरकर यांच्या पत्नी यांची उमेदवारी ठरू शकते असे अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

भाजपा कार्यकर्ते सचिन चूटे प्रभाग क्रमांक सात मधून प्रबळ दावेदार म्हणून उभे आहेत. त्यांच्या नेतृत्वात नगरसेवक गोदावरी गौतम वानखेड़े यांचा प्रवेश आमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत झाल्याने या प्रभागात भाजपाची बाजू प्रबळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अशाप्रकारे, निवडणुकीपूर्व काळात भाजपने वरोरा नगरपालिकेत मजबूत भूमिका घेण्यासाठी सर्व तयारी सुरू केली आहे.
----

Comments