स्थानिक निवडणूक: वरोरा नगरपरिषद निवडणूक २०२५ नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा.ओबीसी महिला राखीव जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात
ओबीसी महिला राखीव जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात
चेतन लूतडे, वरोरा
वरोरा नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाव क्षेत्र क्रमांक १३ साठी ओबीसी महिला राखीव जागेच्या निवडणुकीत पाच जोरदार उमेदवारांमध्ये कठिण स्पर्धा असल्याचे दिसून येते. काँग्रेस, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पाचही प्रमुख राजकीय पक्षांनी या लढतीत आपापले उमेदवार उतरवले आहेत.
उमेदवारांची यादी:
१. अर्चना आशिष ठाकरे - काँग्रेस
२.माया रमेश राजूरकर - भाजप
३.सोनम पंकज नाशिककर - शिवसेना (उबाठा)
४.ज्योती नितीन मत्ते - शिवसेना (शिंदे)
५.रंजना पारशीवे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
मतदारसंघाचे रूपरेषा:
या प्रभाव क्षेत्रात एकूण ४३,३२९ मतदार आहेत. त्यापैकी २१,८२६ महिला मतदार तर २१,४९९ पुरुष मतदार आहेत. तसेच चार 'इतर' मतदारांची नोंदणी झालेली आहे. नगरपरिषदेमध्ये एकूण २७ नगरसेवकांची जागा आहे.
राजकीय समीकरणे आणि महत्त्वाचे मुद्दे:
ज्योती मत्ते यांची निर्णायक भूमिका: काँग्रेस आणि भाजप यांच्या मधील मुख्य लढतीत शिवसेना (शिंदे)च्या ज्योती मत्ते यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. ज्योती मत्ते यांचे पती नितीन मत्ते हे शिवसेना जिल्हाप्रमुख आहे. लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे आणि नितीन मत्ते यांच्याकडे मोठ्या प्रमाणात युवकांची फळी आहे. समाजातून त्यांना चांगला जनाधार मिळू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना पक्षासाठी ते नवसंजीवनी ठरू शकतात. व नगराध्यक्ष पद आपल्या पदरी पाडू शकतात.
काँग्रेसची मजबुती: माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये भर पडल्याचे निरीक्षण आहे.
जातीय समीकरणे: या शहराचे राजकारण जातीय समीकरणांभोवती फिरते. एका विशिष्ट जातीची मते कोण खेचून आणतो यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे.
प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठेची लढत: खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे काँग्रेस उमेदवारांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन आहे. त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे.
राजूरकर पती-पत्नीची राजकीय सोय: रमेश राजूरकर यांना आमदारकीची तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या पत्नी माया राजूरकर यांना भाजप पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली. राजूरकर यांना राजकीय समीकरण जुळवता आले तर नगराध्यक्ष पद भाजपाच्या पदरी पडू शकते.
सोनम नाशिककर यांना मिळालेली संधी: उद्धव बाळासाहेब गटातील शिवसेनेतर्फे सोनम नाशिककर उमेदवार असून प्रमुख पक्षांच्या नाराजीचा फायदा नाशिककर यांना होऊ शकतो. शिवसेनेने वरोरा शहरात 23 जागेवरती उमेदवारी दिल्याने विजयाचे समीकरण बिघडवण्याचे सामर्थ्य नाशिककर यांच्याजवळ आहे.
रंजना पारशीवे यांची जनछाप:
अजित पवार गटातील राष्ट्रवादीच्या रंजना पारशीवे यांची जनसामान्याचे नेतृत्व करणारी महिला म्हणून ओळख आहे. सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतात. विलास नेरकर यांच्यावर ही धुरा असून निवडणुकीच्या रिंगणात विजयाचे चित्र पालटण्याचे सामर्थ्य पारशीवे यांच्याजवळ आहे.
इतर प्रभावशाली व्यक्ती:
आमदार करण देवतळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरू शकतात.
वरोरा येथील नगरपरिषद निवडणूक नक्कीच चुरशीची ठरणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी ५ आणि नगरसेवक पदासाठी १५० उमेदवार असल्याने ही लढत अजून अधिक रोमांचक झालेली आहे. जातीय समीकरणे, प्रमुख पक्षांमधील नाराजी, व्यक्तिगत प्रभाव आणि स्थानिक नेतृत्व या सर्व घटकांचा परिणाम मतदानाच्या निकालावर होणार आहे.
.....
Comments
Post a Comment