वरोरा : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला असून या पार्श्वभूमीवर युवासेना उबाठा गटाचे शहरप्रमुख प्रज्वल जानवे यांनी आज शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पक्षाचे प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवानेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन जानवे यांनी पक्षात प्रवेश केला.
प्रवेश सोहळ्यात प्रज्वल जानवे यांच्यासोबत राजा थैम, सकलेम सय्यद, आकाश हिकरे, विनोद बुरडकर आणि अतिश शेंडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी सांगितले.स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेला संघटनात्मक व राजकीयदृष्ट्या निश्चितच बळकटी देणारा ठरणार आहे, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी या कार्यक्रमात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक दिनेश यादव, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, तसेच संजय तलांडे, अनिकेत काळे, प्रशांत हनुमंते आदी मान्यवर उपस्थित होते.
*****************
जाहिरात
Comments
Post a Comment