चंद्रपूर- अंकुश अवथे
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित आंतरविद्यापीठ ऍथलेटिक्स स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत बहुमोल पदकांची कमाई केली. श्रुती कुशराम २ स्वर्ण, १ रजत, साक्षी घोडमारे १ रजत ,१ कांस्य, रंभा कन्नाके १ रजत, १ कांस्य, साक्षी नागदेवते १ रजत,१ रजत, दिव्या मडावी १ रजत, सुप्रिया मडावी १ कांस्य, मनोज मेश्राम १रजत,विशाल कोवे २ कांस्य.या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आगामी स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता हे विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, सहसचिव कुणाल घोटेकर, सदस्य, अॅड. राहुल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, क्रीडा प्रमुख डॉ. सतीश पेटकर, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. पवन खनके, तसेच प्रा. इम्रान मिठानी, प्रा. स्निग्धा सदाफळे, प्रा. रोशन गजभियेआणि सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment