*तरुण भारत पुरस्कृत थोराणा येथील तुळशी विवाह सोहळा ठरला अनोखा* *चार-पाच वर्षापासून गावात एकही विवाह नाही**तुलसी विवाहाने विवाह होणार सुरू : नागरिकांची अपेक्षा*

*तरुण भारत पुरस्कृत थोराणा येथील तुळशी विवाह सोहळा ठरला अनोखा* 

*चार-पाच वर्षापासून गावात एकही विवाह नाही*

*तुलसी विवाहाने विवाह होणार सुरू : नागरिकांची अपेक्षा*

वरोडा : श्याम ठेंगडी 

*थोराणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दोन ऑगस्ट रोज रविवारला आयोजित तुळशी विवाह सोहळा अनोखा ठरला. या विवाह सोहळ्याला अख्खे गावच उपस्थित झाले. त्यामुळे या तुळशी विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.*
        *श्री नरकेसरी प्रकाशनचे अमृत महोत्सवी आणि दैनिक तरुण भारताचे शताब्दी वर्षानिमित्त तुळस लागवड उपक्रमाअंतर्गत थोराणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा परिसर, अंगणवाडी केंद्र, हनुमान मंदिर, जगन्नाथ बाबा मंदिर, रेणुका माता मंदिर आदी ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये तुळस लागवड करण्यात आली होती. लागवड केलेली सर्व तुळशीची रोपे जगविण्यात आली. गावकरी आणि शाळा प्रशासनाच्या वतीने आज हनुमान मंदिर परिसरातील तुळशीचा विवाह करण्यात आला. या तुळशी विवाहासाठी तरुण भारतच्यावतीने विवाह किट पुरविण्यात आली.*
      *त्यानंतर साडी-चोडी घालून तुळशीला एखाद्या नवरी प्रमाणे सजविण्याची भूमिका सुषमा भट, उषा रिंगोले, सविता बोदाडकर यांनी बजावली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास बोदाडकर, मारोती तावाडे, प्रकाश बावणे व इतरांनी वरात काढून वाजतगाजत कृष्णा नवरदेवाला वधू मंडपी आणले. त्यानंतर मंगलाष्टके म्हणण्यात आली. मंगलाष्टके म्हणण्याची भूमिका लक्ष्मी भट आणि रोहिणी रिंगोले यांनी पार पाडली. या 16 ला गावातील नागरिक नवीन रंगीबेरंगी कपडे घालून उपस्थित होते*
 *मागील चार-पाच वर्षापासून थोराणा या गावात एकाही मुला-मुलींचा एका विवाह सोहळा झाला नाही. त्यामुळे हा तुळशी विवाह सोहळा गावकऱ्यांना आनंद देणारा ठरला.
            या तुळशी विवाहामुळे गावातील मुलामुलींचे लग्न जुळावे, अशी अपेक्षा अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. या तुळशी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने गावकऱ्यांनी सर्वांसाठी अल्पोपहाराची  व्यवस्था केली होती. उपस्थित गावकऱ्यांनी  अल्पोपहराचा आस्वाद घेतला.  या अनोख्या तुळशी विवाहाची पंचक्रोशीत चर्चा आहे.
*या विवाह सोहळ्याला  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास बोदाडकर, योगिता भोयर पूजा मिलमिले, मिराबाई रिंगोले,  माजी मुख्याध्यापक अरुण उमरे, सुषमा भट, अंगणवाडी सेविका उज्वला बोदाडकर, उषा रिंगोले, मारोती तावाडे, लक्ष्मी भट, रोहिणी रिंगोले, प्रकाश बावणे  हेमंत तावाडे, केतन भट, मारोती भट, नागोबा बोदाडकर, तुळशीराम कुंभारे, राजू कुंभारे, विश्वनाथ भट, मधुकर भोयर, नानाजी बावणे, नारायण रिंगोले, मारोती भट, वनिता झट्टे, गजानन भोयर, सहदेव डेबे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाभीटकर, अरुण भोयर, हर्षा रिंगोले, विठ्ठल नागरकर, सुरज रिंगोले,अनुसया रिंगोले, विशाखा चोपणे, रेणुका तावाडे, तुळसाबाई बावणे, सुनील ताजणे, स्वप्निल वेले विद्यार्थी, अंगणवाडीतील चिमुकली विद्यार्थी आदी उपस्थित होते.*



Comments