शिवसेनेला भरघोस मताने विजयी करून द्या.ज्योतीताई मते यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा
शिवसेनेला भरघोस मताने विजयी करून द्या.
ज्योतीताई मते यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा
वरोरा
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेस उपस्थित राहून विराट जनसमुदायासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकून घेतले. यावेळी वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योती मते यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
वरोरा हे थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सेवाकार्याचा प्रवाह अनुभवलेले शहर आहे. या शहराने कायम शिवसेनेवर प्रेम केले आणि नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला, तसाच आपल्याला आताही तो कायम फडकवत ठेवायचा आहे. ही निवडणूक बहुरंगी असली तरीही वरोऱ्याची सर्वांगीण समृद्धी साधायची असेल तर ज्योती ताई आणि शिवसेनेच्या सर्वच शिलेदारांना साथ द्यावी असे आवाहन याप्रसंगी केले.
वरोरा नगर परिषद १५५ वर्षे जुनी असली तरीही विकासापासून वंचित आहे. या शहरात आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, वरोरा शहरातील मुख्य मार्ग आंबेडकर चौक ते जुना वणी नाका परिसर अतिक्रमणांनी गिळंकृत केला आहे. वरोरा तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले. २४ बाय ७ च्या जमान्यात वरोऱ्याला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. घर तिथे बार अशी अवस्था झाल्याने सामाजिक तंटे वाढले आहेत. हे बार कुणाचे आहेत हे आपल्याला माहिती आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते आनंदवन अंडरपास व्हावा अशी आपली मागणी आहे आणि ते करू, शहरात अद्ययावत हॉस्पीटल देऊ, शहरात चांगले मैदान निर्माण करू, गांधी तलावाच्या सुशोभीकरणासाठी देखील निधी देऊ मात्र शहराची परिस्थिती बदलायची असेल तर शिवसेनेला संधी द्यावी अशी विनंती मतदारांना केली.
यावेळी अर्थ राज्यमंत्री ऍड.आशिष जयस्वाल, जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव, नगर परिषद निवडणुकीसाठी उभे असलेले सर्व उमेदवार तसेच वरोरा मधील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि वरोरा येथील नागरिक बंधू भगिनी बहुसंख्येने
उपस्थित होते.
------------------------
Comments
Post a Comment