वरोडा नगरपरिषद निवडणूक--- *आयारामला महत्व: आणखी एका कार्यकर्त्याचा काँग्रेसला रामराम* *निष्ठावान कार्यकर्त्यात नाराजी!*

*वरोडा नगरपरिषद निवडणूक*
------------------------------------------
 *आयारामला महत्व: आणखी एका कार्यकर्त्याचा काँग्रेसला रामराम*
 
*निष्ठावान कार्यकर्त्यात नाराजी!*


वरोडा : श्याम ठेंगडी 
               वरोडा नगरपरिषदेच्या  नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आयाराम गयाराम करणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा सूर असून काँग्रेसला या नाराजीचा सगळ्यात जास्त फटका बसत आहे.
 काल 25 नोव्हेंबर रोज मंगळवार ला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत एका ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याने शिवसेनेत प्रवेश करत काँग्रेसला रामराम केला.यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे
     नगर परिषदेच्या निवडणुकीत  आयाराम गयाराम ना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय पक्षाचे काही कट्टर समर्थक आपआपल्या पदाचा राजीनामा देत असून यात वाढ होण्याची शक्यता असल्याची शक्यता दैनिक तरुण भारतने 24 नोव्हेंबर च्या  निवडणूक वार्तापत्रात वर्तवली होती. राजू महाजन यांच्या काँग्रेसला  सोडचिठ्ठी दिल्याने तरुण भारतचे हे भाकीत खरे ठरले आहे.
  आतापर्यंत काँग्रेसच्या चार जेष्ठ कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून येत्या काही दिवसात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 
      निवडणुकीत आलेल्या नवीन उमेदवारांना महत्त्व  दिल्याने जिल्हा महिला काँग्रेसच्या महासचिव शिरोमणी स्वामी व वरोडा तालुका काँग्रेसचे महासचिव मनोहर स्वामी यांनी 16 नोव्हेंबरला आपल्या पदाचा व सभासदत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसानंतर वरोडा शहर काँग्रेसचे सचिव सनी गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे.
      महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे आपल्या पक्षाच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी 25 नोव्हेंबर रोज मंगळवारला वरोडा येथे आले असता त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजू महाजन यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना भगवा दुपट्टा व भगवी पताका देत प्रवेश दिला. त्यांच्या या प्रवेशाने काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून आगामी काळात काँग्रेसचे काही कार्यकर्ते पक्षाला बाय-बाय करण्याची शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे.
 आपले काँग्रेस पक्षावर नव्हे तर धानोरकर परिवाराशी सख्ख्य व प्रेम असल्याने आपण काँग्रेसची बांधलं गेलो होतो. मात्र आता नवीन लोक जुळत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आपण नाईलाजाने काँग्रेस पक्षाला राम राम केल्याचे प्रतिक्रिया राजू महाजन यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली.

Comments