वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू. दोन्हीही मुलांचे शव पाण्याबाहेर काढण्यात यश. चंद्रपूर रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न.
दोन्हीही मुलांचे शव पाण्याबाहेर काढण्यात यश.
चंद्रपूर रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न.
वरोरा 3/11/2025
चेतन लूतडे
वरोरा : वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या अपघातात दोन मुलांना वाचवण्यात यश आले होते.
मात्र दोन मुले पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला.
रविवारी दुपारी वरोरा येथील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय १३ वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५ वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी वरोरा शहरातून सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने तिथे पोहत असताना चारही मित्र बुडू लागले.
या संकटाचा आवाज ऐकल्यावर जवळच असलेल्या एका गुराख्याने त्वरित पाण्यात उडी मारून बचावकार्य सुरू केले.
गुराख्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना यशस्वीरित्या किनाऱ्यावर काढले. मात्र रुपेश ला काडी चा आधार देण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याला गुराख्याची काडी पकडता आली नाही. आणि प्रणय नदीच्या धारेवर असल्याने दूर वाहत गेला होता.
ही दुर्देवी घटना तिथे असलेले प्रत्यक्ष दर्शनी त्यांचे दोन मित्र व चराई करणार्या व्यक्तीने सांगितले होते.
या घटनेनंतर चंद्रपूर रेस्क्यू टीमने आपले प्रयत्न सुरू केले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत वर्धा नदीपत्रात मुलांचे शव मिळाले नाही. यानंतर आज सोमवारला सकाळी पुन्हा प्रयत्न सुरू केले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन्ही शव पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले.
या मुलांचे शव शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले.
Comments
Post a Comment