अखेर अपघातात मृत्यू अशोक कुमरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून ट्रक पोलिसांच्या ताब्यात आणि ड्रायव्हर लॉकअप मध्ये छोटूभाई व त्यांचे सहकारी यांच्य पाठपुराची दखल
अखेर अपघातात मृत्यू अशोक कुमरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून ट्रक पोलिसांच्या ताब्यात आणि ड्रायव्हर लॉकअप मध्ये
छोटूभाई व त्यांचे सहकारी यांच्य पाठपुराची दखल
वरोरा
वरोरा येथील दत्त मंदिर वार्ड येथील रहिवासी अशोक गोपाळराव कुंबरे वय 63 वर्ष धंदा रोज मजुरी चौकीदारी हे इसम दिनांक 12/ 11/ 2025 ला शहीद योगेश डावले चौक वरोरा येथे रोडच्या बाजूला सायकल घेऊन उभे असताना दहा चक्का आयवा ट्रक क्रमांक MH16DK2777 वाहन चालक गणेश मरस कोल्हे वय 25 वर्ष हे रेल्वे स्टेशन कडून भर वेगात ट्रक चालवत आणून रात्री 8 वाजताच्या सुमारास अशोक यांच्या अंगावरून ट्रक नेऊन त्यांच्या जागेतच मृत्यू झाला आणि ट्रक चालक हा ब्रिज ओलांडून नागपूर रोडवर कडे फरार झाला यावेळी चौकात असलेले नागरिक व पोलीस कर्मचारी यांनी कुमरे यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले असताना ते मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले असता मृतकाला उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले त्यानंतर अनेक वॉर्डातील नागरिक या ठिकाणी जमा झाले यावेळी माजी सभापती शेख जैरूद्दीन छोटूभाई व यांचे सहकारी यांनी ठाणेदार तांबे साहेब यांना फोनवरून सदर माहिती देऊन कार्यवाहीची मागणी केली. त्यावेळी लगेच साहेबांनी पीएसआय मित्तलवार व पीएसआय तलवार यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवले यावेळी छोटूभाई व त्यांच्या कुटुंबातील व सहकारी यांनी जोपर्यंत ट्रक व ड्रायव्हर यांना पोलीस स्टेशनमध्ये जमा करून कार्यवाही व मृतक कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार नाही तोपर्यंत पीएम व अंत्यविधी करण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन मृतकाचे मुलं निलेश कुमरे व निखिल कुमरे व नातेवाईक विलास पेंदे यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला लावले.त्यानंतर छोटूभाई व त्यांचे सहकारी यांनी दिनांक 12 ला रात्री दहा वाजेपासून ते दिनांक 13 ला चार वाजेपर्यंत ठाम भूमिका घेऊन पोलीस स्टेशनमध्ये थांबून यांच्या पाठपुरावा केल्याने ठाणेदार तांबे यांच्या पुढाकाराने पीएसआय तालेवार पीएसआय मित्तलवार व पीएसआय भस्मे यांनी अत्यंत परिश्रम घेऊन अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असताना ट्रक वेगात असल्याने त्याचे नंबर व ओळख होऊ शकली नाही त्यानंतर त्यांनी अनेक त्यांचे खबरी व नागरिकांकडून माहिती घेऊन वर्धा येथून ट्रक शोधून ट्रक व ड्रायव्हरला पोलीस ठाण्यात दुपारी दोन वाजताच्या सुमारास पकडून जमा केले व ड्रायव्हरला तुरुंगात टाकले यावेळी छोटूभाई यांचे सहकारी व मृतकाचे नातेवाईक यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सदर मालक श्री ठाकूर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून मदत करावीअशी ठाम भूमिका मांडल्यावर पोलीस अधिकारी यांनी ट्रक मालक यांच्याशी संपर्क केला तो मुंबईला असल्यामुळे त्यांनी त्यांच्या दिवाणजीला पाठविले त्यानंतर मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्याकरिता चर्चा करून मागणी करण्यात आली अखेर एक तासानंतर दिवाणजी यांनी मालकासोबत बोलून 2 लाख आर्थिक मदत आणि 25000 अंत्यविधी करता छोटूभाई व 100 नागरिकांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय येथे मृतकाचे नातेवाईक विलास पेंदे व निखिल कुंबरे यांना दिले.यावेळी छोटूभाई यांचे सहकारी व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यामध्ये पोलीस व सहकाऱ्यांचे चांगल्या कामगिरीमुळे मृतकाच्या कुटुंबाला नगदी रक्कम 2 लाख 25 हजार व ट्रकचे दस्तऐवजपूर्ण राहिल्याने अंदाजे १५ लाख रुपये पर्यंत इन्शुरन्स प्लॅनची मदत मिळण्याकरता वकिलाकडे सदर प्रकरण देणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Comments
Post a Comment