: वरोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत अपेक्षित; ज्योती मत्ते यांची उमेदवारी प्रबळ
वरोरा, [12/11/2025]: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली असून, वरोरा नगरपालिकेत कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहील हे अजून उघड झाले नाही.
भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे रमेश राजूरकर किंवा शंभुनाथ वरघरे यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी उभे राहू शकतात. काँग्रेस पक्षाच्या बाजूने राजू महाजन यांच्या पत्नी, शशी चौधरी यांच्या पत्नी किंवा ज्ञानेश्वर माटे यांच्या पत्नी यांची उमेदवारी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, या दोन पक्षांपेक्षा वेगळी परिस्थिती निर्माण करून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या पत्नी ज्योती मत्ते यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी चर्चेत आहे. ज्योती मत्ते शिवसेना पक्षामध्ये सक्रिय असून त्यांना राजकीय क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. युवा आणि शिक्षित उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाने ज्योती मत्ते यांची उमेदवारी मंजूर केल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते एकत्र येऊन रणनीती बनवतील, अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेने तेरा प्रभागांमध्ये उमेदवारी दिली असून, नगराध्यक्षपदासाठी ज्योती मत्ते यांचा विचार केला जात आहे. त्यामुळे वरोरा शहरातील राजकीय वर्तुळात हलचल सुरू झाली असून, पुन्हा एकदा शिवसेना शहरात आपली सत्ता प्रस्थापित करेल, अशी आशा जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment