उद्याला दुपारी 4.30वा. सभेचे आयोजन.
बातमी: चेतन लूतडे
वरोरा.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा (मंगळवार, दिनांक 25 नोव्हेंबर, 2025) वरोरा येथे दौरा आहे. त्यांची जाहीर सभा दु.4.30वा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात होणार आहे.
शिवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी पक्षाच्या सर्व शिवसैनिकांना ,आजी /माझी पदाधिकारी ,कार्यकर्त्या आणि मतदार बंधूंना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राचे लाडके भाऊ वरोरा शहरात येत असल्याने लाडक्या बहिणीमध्ये भेटण्यासाठी उत्साह निर्माण झाला असून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या सभेमुळे वरोरा भागातील राजकीय वातावरण अधिकच गतिमान झाले आहे. स्थानिक निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी ही सभा महत्त्वाची मानली जात आहे.
*सभेचे तपशील:*
· वक्ते: महाराष्ट्र नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे
*· स्थळ: कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा येथील पटांगण
· दिनांक: 25 नोव्हेंबर, 2025 (मंगळवार)
· वेळ: 4.30वा.
Comments
Post a Comment