चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण.
चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण.
वरोरा
चेतन लूतडे
पंढरपूर येथील अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण
पंढरपूर येथे होत असलेल्या पत्रकारांच्या अधिवेशनाचा लोगो भद्रावती-वरोरा विधानसभेचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या समस्या विषयी चर्चा करण्यात आली असून या अधिवेशनासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
चंद्रपूर आर्मी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्हॉइस ऑफ मीडया पत्रकार संघटनेचा लोगो अनावरण करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
*दुु:खद मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या परिवाराला मदत*
व्हाॅईस ऑफ मिडीयाचे सदस्य व वरोरा तालुक्यातील दै. पुण्यनगरी चे चारगाव प्रतिनिधी मनोज गाठले यांचे आजाराने जून महिण्यात दुख:द निधन झाले होते. जिल्हास्तरावर अशा पत्रकारांच्या परिवाराला मदत देण्यात येते.
वरोरा, जिल्हा चंद्रपूर चे *आमदार श्री. करणजी देवतळे* यांचे हस्ते श्रीमती आम्रपाली मनोज गाठले यांना चंद्रपूर जिल्हा VOM द्वारे रूपये पाच हजाराची सानुग्रह मदत आणि आवश्यक सामान असलेले कीट तसेच त्यांच्या दोन मुलींना शैक्षणिक किट देण्यात आले.
*यावेळी आमदार करणभाऊ देवतळे यांनी व्हाॅईस ऑफ मिडीया च्या या उपक्रमाचे कौतुक केले.*
यावेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ, डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष आशिष रैच, वरोरा तालुकाध्यक्ष चेतन लुथडे, भद्रावती तालुका उपाध्यक्ष बबलू राॅय, गोपाल निब्रड, श्रीमती आम्रपाली मनोज गाठले, सरकार्यवाह श्रीहरी सातपूते, संघटक रवि खाडे, चिमूर तालुकाध्यक्ष प्रा.राजु रामटेके, सारथी ठाकूर, शाम ठेंगडी सर, हरिश केसवाणी व राजेंद्र मर्दाने उपस्थित होते.
--------
Comments
Post a Comment