लोकमान्य विद्यालयात अकरावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन # संपूर्ण राज्यातून येणार बाल वैज्ञानिक

File image.

लोकमान्य विद्यालयात अकरावे  राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन 
# संपूर्ण राज्यातून येणार बाल वैज्ञानिक 

   वरोरा दि, ४ नोव्हेंबर

शालेय विद्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मराठी विज्ञान परिषद, मुंबई दर तीन वर्षानी राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलनाचे आयोजन करीत असते. यावर्षी  चे अकरावे बाल विज्ञान संमेलन लोक शिक्षण संस्था द्वारा संचालित लोकमान्य विद्यालयात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
     या बाल संमेलनामध्ये महाराष्ट्र राज्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वैज्ञानिक विषयावर सादर केलेल्या १२० प्रकल्प संशोधनात्मक प्रकल्पांपैकी सर्वोत्तम दहा प्रकल्पांचे, शास्त्राज्ञांसमोर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्यातील अंदाजे १००  निवडक विद्यार्थी व ५० शिक्षक संमेलनात सहभागी होणार आहेत.
     या संमेलनासाठी मराठी विज्ञान परिषद मुंबई चे अध्यक्ष व प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी, कुलगुरू आयसीटी मुंबई, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. उदघाटन शास्त्रज्ञ, डॉ. मानसी राजाध्यक्ष तर समारोप डॉ. मिलिंद वाटवे यांच्या उपास्थितीत संपन्न होणार आहे.
      विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित व खगोलशास्त्र विषयाचे  कृतीसत्र तसेच शिक्षकांची कार्यशाळा तज्ञ मार्गदर्शक डॉ विवेक पाटकर, प्रा.मकरंद भोसले, दिलीप हेर्लेकर, प्रा.महादेव खाडे, अभय यावलकर, राजीव वर्तक घेणार असून  यासाठी म.वि.प.मुंबई चे  पदाधिकारी व कार्यकर्ते  सहकार्य करणार आहेत. 
   यावेळी दि. १५ नोव्हेंबर ला आकाशदर्शन अंतर्गत तारे, ग्रह, उपग्रह व आकाशीय गोल खगोलप्रेमी संशोधक कपिल पांडव व ऋतुराज मावळणकर, नागपूर  हे दाखवणार आहेत. दि. १६ नोव्हेंबर ला सांस्कृतिक कार्यक्रम व  १७ ला शैक्षणिक सहल आयोजित आहे.
 लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील, कार्यवाह प्रा विश्वनाथ जोशी, एड. दुष्यंत देशपांडे, डॉ ब्रह्मदत्त पांडे आणि प्राचार्य राहुल राखे यांच्या मार्गदर्शनात संमेलनाची तयारी सुरू असून आकाश दर्शनासाठी इच्छुकांनी आयोजकांशी संपर्क साधावा असे प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.







Comments

Post a Comment