मानू नको घोर तू, ठेवी जोर सोर तू… चाल पुढे सेवका, मोह सोडुनी…”*आज आनंदवनवासीयांसाठी, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वॉटर फिल्टर प्लांट बसविण्यात आला.*

मानू नको घोर तू, ठेवी जोर सोर तू… 
चाल पुढे सेवका, मोह सोडुनी…”

*आज आनंदवनवासीयांसाठी, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वॉटर फिल्टर प्लांट बसविण्यात आला.*

वरोरा 

आनंदवन गावातील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार करणजी देवतळे यांच्या शुभहस्ते  वॉटर फिल्टर प्लांटचे उद्घाटन संपन्न झाले. आनंदवन परिसरातील पर्यटकांसाठी आणि तेथील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने आनंदवनला ही भेट देण्यात आली. आनंदवन परिसरात अंध ,अपंग, मूकबधिर विद्यार्थ्यांसह त्यांचा परिवार सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वसलेला आहे. गेल्या कित्येक वर्षा पासून महारोगी सेवा समिती अनाथांचे व कुष्ठरोग्यांचे पालन हार म्हणून ओळखले जात आहे. या समाजकार्यात एक छोटीशी भर म्हणून आरो प्लांट उभारून मदतीचा हात मान्यवरांनी पुढे केला आहे.

या कार्यक्रमाला डॉ. विकासजी आमटे, आमदार करणजी देवतळे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनराज अस्वले, लक्ष्मणराव गमे , पाथ्रीकरजी, माजी नगराध्यक्ष अनिलजी धानोरकर, सुनील नामोजवार, जयंत भाऊ ठाकरे, प्रवीण बदकी, शंकर धानोरकर, विजय मोकाशी निखिल हिवरकर, राजू डोंगे, राजू मिश्रा, खेमराज कुरेकर, कडू सर,रोहन कुरेमाटे, रमेश मेश्राम संजय उंबरे लक्ष्मणराव ठेंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.


-------
------

Comments