प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*चोरी करणारा आरोपी ताब्यात घेऊन दोन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मो. सा. चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणल्या बाबत*

*चोरी करणारा आरोपी ताब्यात घेऊन  दोन  गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मो. सा. चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणल्या बाबत*


पोलीस ठाणे - दुर्गापूर हद्दीतील cstps मेजर गेट ऊर्जानागर येथून दि  20/09/2025 चे 22:00 ते दिनांक 23/09/2025 चे 02:30 वा. दरम्यान  आणि wcl कॉलनी शक्तिनगर, मेजर गेट ऊर्जानागर येथून  दि  17/06/2024 चे 15:00 ते दिनांक 18/06/2024 चे 12:00 वा. दरम्यान अपराध क्रमांक अनुक्रमे 236/2025* कलम 303 (2), भा. न्या. सं. आणि अप. क्रं. *181/2024* कलम 379, भा.द.वि.या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 2 मोटर सायकल सह आरोपी नामे संदिप रामभाऊ पाटील वय 40 वर्ष, रा.कोंढी वार्ड क्रमांक 05 ऊर्जानगर यास अटक करून त्याचे ताब्यातील चोरीतील 02 मोटार सायकल एकूण किंमत 50,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलिस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदीप एकाडे यांचे नेतृत्वात पो.उपनि.प्रविण बिनकलवार,पो.हवा.योगेश शार्दूल, ना.पो.अं. मोरेश्वर गोरे,पो.अं. मंगेश शेंडे, किशोर वलके, सोनाल खोब्रागडे, रुपेश सावे यांनी केली आहे.



Comments